आपल्या सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील हत्तुर गावातील विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ माजी सहकार मंत्री आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, सरपंच ज्योती कुलकर्णी, डॉ. हविनाळे, आप्पासाहेब पाटील, भीमाशंकर बबलेश्वर, संदीप टेळे, अप्पासाहेब मोटे, यतीन शहा, प्रशांत सलगरे, जगन्नाथ गायकवाड, मळसिद्ध मुगळे तसेच भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार देशमुख म्हणाले दक्षिण तालुका हा वैभवशाली झाला पाहिजे, पण आज तालुक्याची परिस्थिती पाहिली तर साक्षरतेच्या बाबतीत खूप मागे आहे, शैक्षणिक दर्जा खालावलेला आहे, तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती तसेच शेतीचा दर्जा खालावलेला आहे, शेती पूरक व्यवसाय कमी आहेत त्यामुळे तालुक्याचा एकूणच विचार केला तर आर्थिक दृष्ट्या मागासलेला तालुका आहे. त्यामुळे मी पहिले काम केले ते या तालुक्यातील प्रत्येक गावच्या शेतकऱ्यापर्यंत रस्ते करण्याचे काम केले. दळणवळणाचे साधने आली तर विकास व्हायला मदत होते. आता रस्ते झाले यापुढील काम म्हणजे रोजगार निर्मिती आहे त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.