बाबो ! श्रीदेवी फुलारे या सुध्दा सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक ; परंतु कोणाकडून पहा
सोलापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील मराठा समाज आणि आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील हे आक्रमक असून या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात मराठा समाजाच्या वतीने उमेदवार दिला जाणार आहे. त्यासाठी सोलापुरात मराठा समाजाची विचार विनिमय बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक श्री छत्रपती शिवाजी प्रशाला या ठिकाणी घेण्यात आली.
या बैठकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छा व्यक्त केली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली. नगरसेविकेच्या माध्यमातून मी शहरात अनेक विकास कामे केली आहेत. अनेक समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत मला मराठा समाजाच्या माध्यमातून उमेदवारी द्यावी अशी मागणी केल्याचे सांगितले.