Wednesday, September 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘ए आय’चा वापर करून एसीएस हॉस्पिटलमध्ये हृदय शस्त्रक्रिया यशस्वी ; सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 July 2025
in health
0
‘ए आय’चा वापर करून एसीएस हॉस्पिटलमध्ये हृदय शस्त्रक्रिया यशस्वी ; सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा
0
SHARES
704
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘ए आय’चा वापर करून एसीएस हॉस्पिटलमध्ये हृदय शस्त्रक्रिया यशस्वी ; सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा

सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांसह कर्नाटकच्या उत्तरेकडील जिल्ह्यांत वैद्यकीय सेवेसाठी विश्वासार्ह आणि लोकप्रिय ठरलेल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ए आय चा वापर करून एकाच दिवशी हृदयरोगावरील तीन अतिजटिल शस्त्रक्रिया सोमवारी करण्यात आल्या. भैय्या चौक येथे असलेल्या एसीएस हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयरोग तज्ञ डॉ. जसकरण सिंग दुग्गल यांच्या साथीने डॉ. प्रमोद पवार, डॉ. सिद्धांत गांधी यांनी या दुर्मिळ शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती डॉ. प्रमोद पवार आणि डॉ. सिद्धांत गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

हृदयरोगावरील शस्त्रक्रियेत अत्यंत जटिल आणि अवघड समजल्या जाणाऱ्या आयव्हस, रोटा अब्लेशन, बायफरगेशन एन्जोप्लास्टी, इंट्रावॅस्क्युलर लिथो ट्रिप्सी, अल्ट्रा लो कॉन्ट्रास आदी पद्धतींचा वापर करताना यात ए आय चा वापर करून शस्त्रक्रियेचे निदान केल्यास त्यातील अचूकता वाढते हे वैद्यकीय संशोधनातून सिद्ध झाले आहे. याबाबत माहिती देण्यासाठी एसीएस हॉस्पिटलमध्ये सोमवारी आयोजित कार्यशाळेत डॉ. जसकरण सिंग दुग्गल यांनी मार्गदर्शन केले. आणि तीन शस्त्रक्रिया करण्यासाठी मोलाची साथही दिली.

पुणे येथील एका रुग्णाची एक वर्षभरापूर्वी बायपास शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर पुढील सहा महिन्यातच त्यांची रक्तवाहिनी बंद पडली. तसेच अवघ्या तीन महिन्यांपूर्वी एन्जोप्लास्टीही करण्यात आली होती. मात्र तरीही त्या रुग्णाचा त्रास कमी न झाल्यामुळे रुग्ण सोलापुरातील एसीएस हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी दाखल झाला होता. या रुग्णावर तीन तास शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच सोलापूर आणि धाराशिव मधील प्रत्येकी एक रुग्णाच्याही शस्त्रक्रियेचे निदान ए आय द्वारे करण्यात आले.

या दोन्ही रुग्णांच्या हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या ज्या ठिकाणी दुभागत होत्या त्या ठिकाणी बायफरगेशन ही अत्याधुनिक पद्धती वापरून दोन्ही रक्तवाहिन्यातील रक्तपुरवठा सुरळीत करण्यात आला. या दोन्ही शस्त्रक्रिया प्रत्येकी दीड तास चालल्या. या तीनही रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठीचे निदान एआयच्या मदतीने करून डॉ. जसकरण सिंग दुग्गल यांच्या साथीने डॉ. प्रमोद पवार आणि डॉ. सिद्धांत गांधी यांनी या अतिशय जटिल शस्त्रक्रिया केल्या. उपचारानंतर गुरुवारी या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

पुणे, धाराशिव आणि सोलापुरातील रुग्णांवर जटील शस्त्रक्रिया करण्यासाठी मोलाची साथ दिल्याबद्दल डॉ. जसकरण सिंग दुग्गल यांचा डॉ. प्रमोद पवार, डॉ. सिद्धांत गांधी, डॉ. राहुल कारीमुंगी, डॉ. दीपक गायकवाड यांनी सन्मान केला. ए आय चा वापर करून सोलापुरात करण्यात आलेल्या अतिजटिल हृदय शस्त्रक्रियांमुळे सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या पत्रकार परिषदेस डॉ. प्रमोद पवार, डॉ. सिद्धांत गांधी, डॉ. राहुल कारीमुंगी, डॉ. दीपक गायकवाड उपस्थित होते.
—————–

मुंबई आणि पुण्यातील रुग्णांचा सोलापूरवर वाढतोय विश्वास
सोलापुरातील वैद्यकीय सेवेचा दर्जा आणि विस्तार वाढत असल्यामुळे मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरांतून सोलापुरात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. यातून मुंबई आणि पुण्यातील रुग्णांचा सोलापूरवर विश्वास वाढत असल्याचे दिसून येत आहे.
—————-

कोण आहेत डॉ. जसकरण सिंग दुग्गल ?
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयरोग तज्ञ असलेले डॉ. जसकरण दुग्गल मुंबईस्थित जहांगीर हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ हृदयरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक दशके आर्मी हॉस्पिटलमध्ये सेवा दिली आहे.
————-

चेन्नई आणि कोचिनमध्ये घेतले प्रशिक्षण
डॉ. प्रमोद पवार यांनी चेन्नई येथील मद्रास मेडिकल मिशन हॉस्पिटल तसेच कोची येथील लिसी हॉस्पिटल मध्ये रोटा अब्लेशन आणि आयव्हसचे तांत्रिक आणि शास्त्रीय प्रशिक्षण घेतले आहे. त्या ज्ञानाचा उपयोग डॉ. प्रमोद पवार रुग्णांसाठी करत आहेत.
———–

एक वर्षभरापूर्वी पुण्यात माझी बायपास शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर पुढील सहा महिन्यातच रक्तवाहिनी बंद पडली. तीन महिन्यापूर्वी एन्जोप्लास्टीची शस्त्रक्रियाही करण्यात आली. डॉ. प्रमोद पवार यांच्याबद्दल मला माहिती कळल्यामुळे मी सोलापुरात येऊन शस्त्रक्रिया करून घेणे पसंत केले. विशेष म्हणजे पुण्याच्या निम्या खर्चात माझी शस्त्रक्रिया झाली. आता माझी प्रकृती उत्तम आहे.
— अनिल चव्हाण, रुग्ण, पुणे
———-

आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान रुग्णांसाठी उपलब्ध

वैद्यकीय क्षेत्रात येणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान रुग्णांना उपलब्ध करून देण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. त्याकरिता चेन्नई आणि कोची येथे याबाबतचे प्रशिक्षण घेतले आहे.
—- डॉ. प्रमोद पवार, कार्डियोलॉजिस्ट, एसीएस हॉस्पिटल, सोलापूर

Tags: ACS hospitalAI technology
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर झेडपीत पारदर्शकता ; अनुकंपात १२४ जणांची समुपदेशनाने भरती

Next Post

सोलापूरच्या ‘सुशील’वर काँग्रेसने दिली शहरात मोठी जबाबदारी ; साहेबांनी केला सत्कार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूरच्या ‘सुशील’वर काँग्रेसने दिली शहरात मोठी जबाबदारी ; साहेबांनी केला सत्कार

सोलापूरच्या 'सुशील'वर काँग्रेसने दिली शहरात मोठी जबाबदारी ; साहेबांनी केला सत्कार

ताज्या बातम्या

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999377
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group