Saturday, October 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सचिन कल्याणशेट्टी – सिद्रामप्पा पाटील गटाचे निर्विवाद वर्चस्व ; ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है !

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 April 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट, दि.17 : संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्वामी समर्थ शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद वर्चस्व सिध्द झाले असून, तालुका शिवसेना प्रमुख संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्वामी  शेतकरी बचाव पॅनलचा दारुण पराभव झाला.

 यामध्ये अक्कलकोटच्या माजी नगराध्यक्षा डॉ.सुवर्णा मलगोंडा, राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनिल बंडगर, कोळीबेटचे माजी सरपंच व बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश दुपारगुडे यांच्यासह अन्य तीन जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून साखर कारखान्याचे विद्यमान संचालक संजीवकुमार पाटील यांना 42 पैकी 41 मतांनी विजयी होवून सहकारी संस्थेमध्ये सिद्रामप्पा पाटील यांचे वर्चस्व सिध्द झाले आहे.

निकाल लागताच माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे अभिनंदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री अतुल सावे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदींनी अभिनंदन केले. 

निकाल बाहेर येताच कार्यकर्त्यांनी  गुलालाची मुक्त उधळण करीत एकच जल्लोष साजरा केला. दरम्यान रविवारी अक्कलकोट तालुक्यातील 45 मतदान केंद्रावर 29.17 टक्के मतदान झालेले होते. या अगोदर स्वामी समर्थ शेतकरी विकास पॅनलचे 13 उमेदवार बिनविरोध निवड झाले होते. 

सिद्रामप्पा पाटील, बसलिंगप्पा खेडगी, विश्वनाथ भरमशेट्टी, अप्पासाहेब पाटील, दिलीप पाटील, भिमाशंकर धोत्री, उत्तम वाघमोडे, महेश पाटील, दिलीप शावरी, देवेंद्र बिराजदार, अभिजित सवळी, संजीव अंबाजीप्पा पाटील, श्रीमंत कुंटोजी आदींचा बिनविरोध निवड झालेली आहे.

सोमवारी सकाळी श्री कमलाराजे चौकातील प्रियदर्शिनी मंगल कार्यालयातील मतमोजणीस प्रारंभ झाला. प्रारंभी सहकारी संस्था मतदारसंघाचा निकाल लागला. यामध्ये संजीवकुमार पाटील हे 41 मतानी विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी संजय पांढरे यांना स्वत:चे मत पडले आहे. याबरोबर उर्वरित पाच गटातील उमेदवारांचा देखील दारुण पराभव झाला आहे.

महिला मतदारसंघातून गिरीजा भिमाशंकर विजापुरे 5 हजार 100 मते (विजयी), महानंदा चंद्रशेखर निंबाळ 5 हजार 175 (विजयी) तर डॉ.सुवर्णा मलगोंडा 500 (पराभव), रुक्मिणीबाई भिमाशंकर मदने 385 (पराभव), अनु.जाती, जमाती : शिवप्पा मारुती बसरगी 5 हजार 306 (विजयी), प्रकाश मसा दुपारगुडे 374 (पराभव), श्रीमंत शिवलिंगप्पा देसाई 134 (पराभव), इतर मागास वर्ग : मल्लिकार्जुन महादेव बिराजदार 5 हजार 340 (विजयी), प्रशांत विश्वनाथ गुरव 373 (पराभव), जाफर अप्पाभाई जमादार 104 (पराभव), भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास : ब्रह्मनाथ भुताळी घोडके 5 हजार 329 (विजयी), भिमाशंकर बिरप्पा निंबाळ 97 (पराभव), सुनिल शिवाजी बंडगर 391 (पराभव)

स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या गेल्या 25 वर्षापासून माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे वर्चस्व आहे. यंदाच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची पाटलांना मोलाची साथ लाभल्याने आगामी अक्कलकोट व दुधनी बाजार समितीच्या निवडणुका देखील जिंकूच असा निर्धार भाजपा कार्यकर्त्यांनी केला आहे.

सहकारी संस्थेवर सिद्रामप्पा पाटील यांचेच वर्चस्व

सिद्रामप्पा पाटील हे तालुक्यातील सहकार क्षेत्रात गेल्या पाच दशकापासून दबदबा कायम आहे. 85 वर्षे सिद्रामप्पा पाटील हे आजही सहकार क्षेत्रावर अबाधित सत्ता कायम ठेवत सहकारी संस्थेमधील केलेल्या उल्लेखनीय कामामुळे शक्य झालेले आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची मोलाची साथ लाभत आहे.

ये तो ट्रेलर है । पिक्चर अभी बाकी है ।

अक्कलकोट तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या तीन सहकारी संस्थांच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यापैकी साखर कारखाना निवडणुक संपन्न झाली. यामध्ये आजी-माजी आमदारांनी बाजी मारली. साखर कारखाना निवडणूकीचा हा ट्रेलर आहे. अक्कलकोट व दुधनी बाजार समिती निवडणूक म्हणजे पिक्चर अभी बाकी आहे, असे साखर कारखान्याचे नूतन संचालक अप्पासाहेब पाटील यांनी सांगितले.

SendShareTweetSend
Previous Post

पालकमंत्री विखे पाटील यांचे आभार मानत, श्री बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराने केला जल्लोष

Next Post

अजित पवार भाजप सोबत जाणार का? प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिले हे उत्तर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

अजित पवार भाजप सोबत जाणार का? प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिले हे उत्तर

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002277
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group