Tuesday, August 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण ; जिल्हाधिकाऱ्यांनी या विभागाचे केले विशेष कौतुक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 May 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : आरोग्य, पर्यटन, शिक्षण, उद्योग, कृषि, स्मार्ट सिटी योजनांच्या माध्यमातून  सोलापूर जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिली. महाराष्ट्र दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे, जिल्हाधिकारी भारत वाघमारे आदिंसह विविध विभागांचे प्रमुख शासकीय अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शंभरकर महाराष्ट्र व कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना म्हणाले, मागील काही दिवसात सोलापूर साठी चांगले निर्णय घेण्यात आले आहेत त्यामध्ये वंदे भारत ही ट्रेन सुरू करण्यात आली. राज्याच्या अर्थसंकल्पात सोलापुरात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सुरू करण्याचा निर्णय झाला. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध विकासाची व लोकोपयोगी कामे होत आहेत. जिल्हा वार्षिक विकास योजनेत सर्वसाधारण अनुसूचित जाती उपाय व आदिवासी विकास योजनेसाठी 645 कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हा कृषी क्षेत्रात ही भरीव कामगिरी करीत आहे. गेल्यावर्षी देशभरात सोळा हजार कंटेनर केळी निर्यात झाली त्यापैकी 50 टक्के केळी निर्यात ही सोलापूर जिल्ह्यातून झाली आहे. वसुंधरा अभियान मध्ये राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी तसेच पंचायतराज अभियानात आणि उमेद अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदेचे शंभरकर यांनी विशेष अभिनंदन केले. महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाचेही त्यांनी विशेष कौतुक केले.

प्रारंभी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. 

त्यानंतर परेड निरीक्षण व परेड संचलन करण्यात आले. परेड संचलनात राज्य राखीव पोलीस बल, जलद प्रतिसाद पथक, गृहरक्षक दल, पोलीस विभाग महिला व पुरूष पथक, शहर वाहतूक शाखा, सोलापूर शहर वाद्यवृंद पथक, तसेच  श्वान पथक, फॉरेन्सिक सायन्स व्हॅन, बीडीडीएस, महारक्षक, वज्र वाहन, वरूण वाहन यांनीही या संचलनात सहभाग नोंदवला. ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी उपस्थितांची भेट घेऊन नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

सोलापूर शहर व ग्रामीणच्या 29 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाहीर झालेल्या महासंचालक पदकाचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच राज्याच्या सेवेत नियुक्त झालेल्या दहा उमेदवारांना प्राथमिक स्वरूपात नियुक्तीपत्र देण्यात आले. उत्कृष्ट तलाठी म्हणून अमोल कांबळे यांना गौरवण्यात आले. सूत्रसंचालन पोलीस कॉन्स्टेबल मलकप्पा बणजगोळे यांनी केले.

SendShareTweetSend
Previous Post

अक्कलकोट – दुधनीत आता म्हेत्रे नाही तर कल्याणशेट्टीच ‘दादा ‘ ; दुधनीतील म्हेत्रेंच्या अनेक वर्षाच्या सत्तेला सुरुंग

Next Post

महाराष्ट्र दिनी दक्षिण पंचायत समितीमध्ये शासकीय ध्वजारोहण ; अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या केशरी फेट्यानी वेधले लक्ष

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

महाराष्ट्र दिनी दक्षिण पंचायत समितीमध्ये शासकीय ध्वजारोहण ; अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या केशरी फेट्यानी वेधले लक्ष

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996462
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group