Saturday, October 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अक्कलकोट – दुधनीत आता म्हेत्रे नाही तर कल्याणशेट्टीच ‘दादा ‘ ; दुधनीतील म्हेत्रेंच्या अनेक वर्षाच्या सत्तेला सुरुंग

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 May 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ता परिवर्तन झाले असून या ठिकाणी विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या गटाची सत्ता आली आहे. शांत व नियोजपूर्वक ही निवडणूक लढवून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आपले विरोधक म्हेत्रे यांचा करेक्ट कार्यक्रम केला.

 याठिकाणी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पॅनलचा पराभव झाला असून त्यांना या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. दुधनीत बाजार समितीच्या स्थापनेपासून म्हेत्रे गटाची सत्ता होती ती उलथवून टाकण्यामध्ये आमदार कल्याणशेट्टी व पाटील गटाला मोठे यश आले आहे. या ठिकाणी एकूण १८ जागा होत्या त्यापैकी दोन जागा या बिनविरोध झाल्याने उर्वरित १६ जागांसाठी ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. 

यात १६ जागांपैकी १२ जागा ह्या आमदार कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने जिंकल्या. तर ६ जागांवर म्हेत्रे गटाला समाधान मानावे लागले. एकूण जागांचा विचार करता १८ पैकी भाजपने सोसायटीत ११ व ग्रामपंचायतीत १ अशा १२ तर काँग्रेसने ग्रामपंचायतमध्ये ३, व्यापारी २ बिनविरोध, हमाल तोलार मतदार संघातून १ अशा ६ जागा जिंकल्या आहेत. प्रारंभी सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ झाला.दुपारी ४ वाजेपर्यंत एकूण याठिकाणी ९७ टक्के मतदान झाले.

 मतदान आणि मतमोजणी दोन्ही एकाच दिवशी असल्याने दुधनीमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. सकाळच्या सत्रामध्ये मोठया प्रमाणात मतदान झाले. दोन्ही बाजूने अतिशय चुरशीने झालेल्या या निवडणुकीत प्रत्येक जण आपापला अंदाज बांधत होता. यात नागणसूर मैंदर्गी आणि दुधनी या तिन्ही ठिकाणी आपापल्या गटाच्या नियोजनानुसार प्रत्येक जण पॅनलच्या विजयासाठी प्रयत्न करताना दिसत होता. या निवडणुकीत कधी नव्हे इतकी चुरस पाहायला मिळाली. आमदार कल्याणशेट्टी व माजी आमदार पाटील गटाकडून ते स्वतः व भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, आप्पासाहेब पाटील, महेश पाटील. अप्पसाहेब परमशेटी, सनील बंडगर, शिवशरण जोजन हे मतदान केंद्राच्या ठिकाणी ठाण मांडून होते.

 तर म्हेत्रे गटाकडून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे, माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे, अशपाक बळोरगी, मल्लिकार्जुन पाटील व काँग्रेसचे नेतेमंडळी उपस्थित होते. निवडीनंतर भाजपच्या विजयी उमेदवाराने एकच जल्लोष केला.

उमेदवार निहाय मिळालेली मते खालील प्रमाणे – सहकारी संस्था सर्वसाधारण – चंद्रकांत कालिबत्ते (१८१), विश्वनाथ कोगनूर (२०१ विजयी), मल्लिकार्जुन झळकी (२०१ विजयी), अशोक ढंगापुरे (१७७), विश्वनाथ नागुर (२०२ विजयी), सातलींगप्पा परमशेट्टी ( २०० विजयी ), सतीश प्रचंडे (१७९), काशिनाथ बणजगोळ ( १८०), सिद्धाराम बाके ( २०४ विजयी), देवेंद्र बिराजदार (२०५ विजयी), काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे (१७७), महादेव येळमेली (१७२ ), मोतीराम राठोड (२०१ विजयी), राजेंद्र हौदे ( १७४), सहकारी संस्था सर्वसाधारण महिला राखीव – मल्लम्मा दुर्गी (१८६), विजयालक्ष्मी पाटील (१७६), सुवर्णा मचाले (२०३ विजयी ), अश्विनी सालेगाव ( २०३ विजयी), सहकारी संस्था इतर मागासवर्ग प्रथमेश म्हेत्रे (१८५ ), – वहीदपाशा शेख (२०१ विजयी), सहकारी संस्था भटक्या जाती विमुक्त जमाती – महेश जानकर ( १७८), निंगणणा पुजारी (२०८),

ग्रामपंचायत सर्वसाधारण –

सिद्धाराम तोळणूरे (१७१ विजयी), रमेश पाटील (१७० विजयी), सिद्धणा पुजारी (१६८ ) , मल्लिनाथ बिराजदार ( १६६ ) ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मतदारसंघ – शिवानंद पाटील (१२१ विजयी), लक्ष्मीपुत्र बिराजदार ( ११४), ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती – – विश्वनाथ इटेनवरु (११४ ), इराणा दसाडे ( १२३ विजयी), हमाल व तोलार – बाबू कोळी ( १४५ विजयी), सैदप्पा मानकर (६६), व्यापारी मतदारसंघ – सातलिंगप्पा परमशेट्टी, चंद्रकांत येगदी हे म्हेत्रे गटाचे यापूर्वी बिनविरोध झाले आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र सुरू ; अध्यासन केंद्रास पहिल्या दिवशी 75 हजार रुपयांची देणगी

Next Post

सोलापुरात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण ; जिल्हाधिकाऱ्यांनी या विभागाचे केले विशेष कौतुक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण ; जिल्हाधिकाऱ्यांनी या विभागाचे केले विशेष कौतुक

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002249
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group