पंचायत समिती दक्षिण सोलापूरच्या वतीने एक मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सह्या गटविकास अधिकारी शितल बुलबुले, गटशिक्षणाधिकारी गोरखनाथ पाथरूठ, उप अभियंता विलास भोसले, सुनील कटकधोंड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दिगंबर गायकवाड आदी उपस्थित होते. याप्रसंगी गटविकास अधिकारी वाघ यांच्या हस्ते सर्व कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहाय्यक प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज, आप्पासाहेब गायकवाड, तजमुल मुत्तवली , विनायक कुंचपुर, बाळासाहेब ममाने, नरेंद्र सरवदे, विनायक माने, रवी इग्लोर आदिनी परिश्रम घेतले.



















