सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले आहे. त्याचबरोबर त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्याचा ही निर्णय घेतला आहे. ‘लोक माझे सांगाती’ या कार्यक्रमात त्यांनी हा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.
राजकारणामध्ये सुमारे 63 वर्ष मी पदे भोगली आहेत. त्यामध्ये पण वर्ष मी सत्तेमध्ये होतो आता कुठेतरी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. सुदैवाने महाराष्ट्राच्या जनतेने मला एकदाही पराभव दाखवला नाही हे माझे भाग्य समजतो. आता मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा करत त्यांनी राज्य आणि केंद्राच्या राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे सांगितले. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून मी पक्षाचा अध्यक्ष आहे आता मात्र हे अध्यक्षपद मी सोडत आहे अशी घोषणा त्यांनी केल्यावर उपस्थितांमधून गोंधळ उडाला. शरद पवार नक्की काय म्हणाले पहा हा व्हिडिओ…



















