Thursday, November 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात आडम मास्तरांचा आदर्श ; कामगार दिन असा साजरा करावा ; दिवंगत कार्यकर्त्याच्या कुटुंबाला केली अशी मदत

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 May 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या जनताविरोधी धोरणांमुळे कामगार हा रसातळाला जात आहे. अशा कामगारांना कायद्याचे संरक्षण कवच काढून घेण्याचे पाप सरकरने केले आहे. दिवसेंदिवस आहे रे आणि नाहीरे वर्गाची दरी वाढत असून गरिबीने उच्चांक गाठलेले आहे. देशात भांडवलदार आणि जमीनदार यांना सरकारचे अभय आहे.  म्हणून त्यांना मातीत गाडून,  फेकून देऊ गरीबचं ओझं आणू कष्टकऱ्यांच राज! हा निर्धार या १ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनी आपण केला पाहिजे असे आवाहन आपल्या अभिभाषणात ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी केले. 

१ मे रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही सिटूचे मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर येथे आंतरराष्ट्रीय कामगार दिन, महाराष्ट्र दिन व सोलापूर महानगरपालिका वर्धापन दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण व अभिभाषण समारंभ पार पडला. संपूर्ण परिसरात लाल रंगाचे फरारे, सुबक रांगोळी, फुलांची सजावट, लाल रंगाचे वस्त्र परिधान करून शहीद शूरवीरांनी दिलेला क्रांतीचा लाल झेंडा ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रजा नाट्य मंडळ कला पथकाच्या वतीने क्रांती गीते सादर करून कार्यकर्त्यांमध्ये स्फुलिंग चेतावले. तसेच यावेळी पक्षाचा लढाऊ कार्यकर्ता कॉ. शकील आगवाले यांचे नुकतेच आकस्मित निधन झाल्यामुळे त्यांच्या परिवारावर संकटाची कुऱ्हाड कोसळली. त्यांच्या परिवाराला सिटू कडून १ लाख २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली. 

यावेळी सिटूचे महासचिव कॉ. एम.एच.शेख यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हणाले कि,  कामगारांच्या नोकऱ्या, वेतन, कामाची परिस्थिती आणि मोठ्या कष्टाने लढून मिळवलेले अधिकार, लाभ आणि मूलभूत हक्क यांच्यावर सत्ताधारी वर्गाच्या होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात, सर्व प्रकारचा त्रास, दडपशाही व शारीरिक हल्ल्यांसारख्या अमानुष हल्ल्यांना तोंड देऊन शूरपणे लढणाऱ्या जगातील कामगार, कष्टकऱ्यांना भातृभावी अभिवादन करीत आहे. जगभरात जवळ जवळ सर्व खंडांमधील अनेक देशांमध्ये कामगारांच्या सर्व विभागांना व्यापून टाकणाऱ्या कामगारांच्या लढ्यांच्या लाटा उसळलेल्या पहायला मिळत आहेत. अशावेळी कामगारांची एकजूट काळाची गरज आहे. म्हणून जागातील कामगारानो एक व्हा हा संदेश पुढे घेऊन जाऊ या असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.   

यावेळी  सिद्धप्पा कलशेट्टी,नसीमा शेख,कॉ.नलिनी कलबुर्गी, युसूफ मेजर, दीपक निकंबे,  कुरमय्या म्हेत्रे,कामिनी आडम,म.हनिफ सातखेड,प्रा.अब्राहम कुमार,शेवंता देशमुख,सुनंदा बल्ला, मुरलीधर सुंचू,सलीम मुल्ला, विक्रम कलबुर्गी, दत्ता चव्हाण, अँड.अनिल वासम,बाळकृष्ण मल्ल्याळ, सनी शेट्टी,शकुंतला पाणीभाते, बाबू कोकणे,विरेंद्र पद्मा,  अशोक बल्ला, लिंगव्वा सोलापूरे,दाऊद शेख, नरेश दुगाणे, अकील शेख,विजय हरसुरे, आरिफ शेख, इलियास सिद्दीकी, आसिफ पठाण,अफसना बेग, अमित मंचले, शाम आडम आदींसह यावेळी सिटूचे राज्य व जिल्हा पदाधिकारी व समिती सदस्य व नागरिकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अँड.अनिल वासम यांनी केले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरातील सोनांकुर कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करा ; महाराष्ट्र दिनी आंदोलनाने वेधले लक्ष

Next Post

शरद पवारांचा कार्यकर्त्यांना मोठा धक्का ; मी यापुढे निवडणूक लढविणार नाही, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद सोडणार ; काय म्हणाले पवार पहा व्हिडीओ

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

शरद पवारांचा कार्यकर्त्यांना मोठा धक्का ; मी यापुढे निवडणूक लढविणार नाही, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद सोडणार ; काय म्हणाले पवार पहा व्हिडीओ

ताज्या बातम्या

१५ वर्षांपासून राजूबाई मॅटर्निटी होमचे काम रखडले; महापालिकेचे कोठ्यावधींचे नुकसान झाल्याचा आरोप! मंत्री चंडक कन्स्ट्रक्शन व जबाबदार अधिकाऱ्यांच्या चौकशीची सीए सुशील बंदपट्टे यांची मागणी

१५ वर्षांपासून राजूबाई मॅटर्निटी होमचे काम रखडले; महापालिकेचे कोठ्यावधींचे नुकसान झाल्याचा आरोप! मंत्री चंडक कन्स्ट्रक्शन व जबाबदार अधिकाऱ्यांच्या चौकशीची सीए सुशील बंदपट्टे यांची मागणी

18 November 2026
ब्रेकिंग ! मोहिते पाटील, शिंदे, माने, हसापुरे, पाटील, परिचारक, म्हेत्रे, आवताडे, बागल यांचे अर्ज बाद ; सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, धैर्यशील मोहिते पाटील, बाबासाहेब देशमुख यांचे अर्ज मंजूर

3 November 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

ब्रेकींग: बार्शी, मंगळवेढा, मोहोळ बिनविरोध? ; खासदार आमदारांसह हसापूरे यांचे शक्ती प्रदर्शन ; एक खासदार अन् सहा आमदारांची उमेदवारी

30 October 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

29 October 2026
सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

Our Visitor

2008815
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group