सोलापूर : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते त्यांनी सोलापुरात एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याबाबत आपले मत मांडले.
ते म्हणाले, शरद पवारांनी जो राजीनामा दिला होता तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, कार्यकर्त्यांनी दबाव आणला आणि त्यांनी पुनश्च अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. शरद पवारा नंतर देशपातळीवर काम करणारा नेता कोणी नव्हता, लोकांची इच्छा होती तो लोकांचा कौल पवारांनी मान्य केला. मध्यंतरी अजित पवारांविषयी चर्चा होती, अजित दादा 40 ते 42 आमदार घेऊन भाजप सोबत येणार अशा पद्धतीची चर्चा होती. अजितदादांची कल्पना सर्वांना होती त्याची चर्चा देखील सुरू होती, दादांच्या मनात असण्याची शक्यता आहे, एकदा दादा देवेंद्र फडणवीस सोबत शपथ विधीला गेले होते उपमुख्यमंत्री झाले होते. अजित दादांच्या मनात असू शकते शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेस ऐवजी भाजपसोबत जावे अशी भूमिका असू शकते परंतु शरद पवारांचा त्यांना पाठिंबा नसल्याने दादांनी निर्णय बदलला असावा असे ते म्हणाले.
कर्नाटक निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले, कर्नाटकात खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात केलेली काम पाहता नागरिक भाजपाला मतदान करतील. कर्नाटकात काँग्रेसने किती खेळ केला तरी भाजप सत्तेवर येणार आहे, एक्झिट पोल कसेही असले तरी आमचा विश्वास असून भाजप सत्तेवर येईल यापूर्वीही एक्झिट पोल बदलले आहेत. भाजपने प्रचारात आघाडी घेतली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला गर्दी होत आहे रिपब्लिकन पक्ष ताकतीने भाजपसोबत उभा आहे. दलित मतदार भाजपचे सोबत खंबीरपणे उभे आहेत, एक्झिट पोलचा रिपोर्ट काही असला तरी भाजप सत्तेवर येणार असा दावा त्यांनी केला.
आमच्या सरकारकडे 164 आमदार आहेत त्यामुळे आम्हाला भीती अजिबात नाही. सुप्रीम कोर्टातील निर्णय मेरिट वर झाला एका केस मध्ये कोर्टाने म्हटले आहे कोर्ट भावनेवर विचार करत नाही चे कायदे आहेत त्यावर निर्णय होत असतात. एकनाथ शिंदे यांच्याकडे 75 टक्के मेजॉरिटी आहे कोर्टाचा निकाल त्यांच्या बाजूने येईल आम्हाला विश्वास आहे.
बजरंग दल बंदीवर रिपाइची भूमिका विचारली असता बजरंग दलावर बंदीची मागणी होत असते, मागणी केली म्हणजे लगेच त्याचा विचार होतो असे नाही, लोक मागणी करत असतात. लोकशाहीमध्ये आरोप प्रत्यारोप करण्याचा अधिकार असल्याचे ते म्हणाले.

















