सोलापूर : जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या जलजीवन मिशन योजनेचे कामकाज अनेक दिवसापासून चर्चेचा विषय आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये 855 कामांच्या वर्कर दिल्या गेल्या आहेत. टेंडर मध्ये गोंधळ झाल्याने अनेक तक्रारी समोर आल्या. आमदारांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये आवाज उठवला त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासन आता सावधगिरीने पावले उचलत आहे प्रत्येक काम पूर्ण करण्याकडे प्रशासन लक्ष देत आहे.
याच पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेण्यात आला या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांच्यासह सर्व उपाभियंता, कनिष्ठ अभियंता, कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भरगच्च अशी बैठक झाली.
सुरुवातीला सुनील कटकधोंड यांनी सर्व तालुका निहाय सविस्तर असा आढावा घेतला. प्रलंबित असलेल्या कामाबाबत त्यांनीही नाराजी व्यक्त करत कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. त्यानंतर कामाची आकडेवारी पाहता सीईओ स्वामी यांनी उपस्थित सर्व अभियंत्यांना झाप झाप झापले.
” तुम्ही लोक नेमके किती तास काम करता, एवढे काम पेंडींग का? शाळा अंगणवाड्याला नळ जोडण्या का झाल्या नाहीत. इतकी मोठी यंत्रणा करते तर काय? नुसता टाइमपास चालला आहे, कुठेतरी एका कामाला भेट द्यायची आणि दिवसभर पंचायत समितीमध्ये येऊन बसायचे. आता सर्व गटविकास अधिकाऱ्यांना शोकास नोटीसा काढा. त्यांनी किती जलजीवन मिशनच्या कामांना भेटी दिल्या? किती काम पूर्ण आहेत? तपासण्या केल्या का?.
सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी चांगलेही कामे झाले आहेत त्याच्या सक्सेस स्टोऱ्या करा, ते लोकांसमोर आले पाहिजे, ज्यांना या योजनेतून घरापर्यंत पाणी मिळाले आहे त्या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घ्या अशा अनेक सूचना स्वामी यांनी केल्या.




















