ब्रेकिंग : मनिषा कुंभार सोलापूरच्या नव्या निवासी उपजिल्हाधिकारी ; गजानन गुरव, अभिजीत पाटील, रेखा सोळंके यांचीही बदली
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आता निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या जागेवर पुणे महानगर विकास प्राधिकरण उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांची नियुक्ती झाली आहे.
पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांची बदली झाली असून त्यांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे येथे उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. भूसंपादन क्रमांक 11 चे उपजिल्हाधिकारी अभिजीत जाधव यांचीही बदली झाली असून त्यांची सातारा येथे भूसंपादन अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे उपजिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड आले आहेत.
भूसंपादन क्रमांक एकच्या उपजिल्हाधिकारी डॉक्टर रेखा सोळंके यांची बदली भूसंपादन पुणे या ठिकाणी झाली आहे. त्यांच्या जागेवर पुणे येथील उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.