लव्ह जिहाद विषयावर आधारित केरळ स्टोरी चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाले असून,या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदू तरुणींना कशापद्धतीने फसविले जाते,या बाबत जनजागृती करण्यात आली असून,देशभरात या चित्रपटास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सोलापूरात महिलांसाठी या चित्रपटाचे विशेष आयोजन उमा टॉकीज येथे भाजयुमोचे अक्षय अंजिखाने यांनी केले होते या उपक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व विशेष म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले होते.
या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना अक्षय अंजिखाने म्हणाले की केरळ स्टोरी चित्रपट प्रत्येक हिंदू बांधवांनी आपल्या परिवारासमवेत पाहावा व या माध्यमातून जनजागृती करावी व जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी महिलांसाठी विशेष शो चे आयोजन करून हा चित्रपट दाखवावे अशी विनंती केली.
याप्रसंगी अमर गट्टी,महेश जेऊर, नरेश ताटी,डोंगरेश चाबुकस्वार व मित्र परिवार उपस्थित होते.





















