सोलापूर : सोलापूर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख हे आपल्या स्वभावाने परिचित आहेत. अनेक जण त्यांच्या स्वभावाबाबत चर्चा करतात. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य कधीतरी एकदा पाहायला मिळते. बापूंचा चेहरा पाहिला असता बापूंना नेमके टेन्शन कशाचे असा प्रश्न सामान्य जनतेला तर पडत असेल परंतु पत्रकारही याबाबत वारंवार चर्चा करतात.
त्यांच्या धीरगंभीर चेहऱ्याचा मजेदार किस्सा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या दौऱ्यात पाहायला मिळाला. शिवस्मारक याठिकाणी बावनकुळे यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन भारतीय जनता पार्टीने केले होते. तिथे बाहेर त्यांचे स्वागत करायला आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, धैर्यशील मोहिते पाटील, खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी हे थांबून होते.
बावनकुळे यांचे आगमन झाले त्यांच्यासोबत शहराध्यक्ष विक्रम देशमुख व जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी हे आले. दोन्ही देशमुखांनी हातात बुके घेऊन बावनकुळे यांचे स्वागत केले तेव्हा बापूंचा बुके हातात धरल्यानंतर फोटोग्राफर सरसावले. बावनकुळे यांनी फोटोमध्ये कल्याणशेट्टी यांना बोलवून घेतले, फोटो काढताना बापूंचा चेहरा ठरलेल्या प्रमाणे होता तेव्हा बावनकुळे यांच्या लक्षात आले त्यांनी त्यांच्या चेहऱ्याकडे पहात बापू “चेहरा जरा हसरा करा” असे म्हणताच बापू ही हसले. पहा हा व्हिडिओ नक्की काय घडले यावेळी.




















