Monday, August 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यात 15 मे पासून कचरामुक्त गाव अभियान ; कसे असणार अभियान वाचा सविस्तरपणे

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 May 2023
in solapur
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 





सोलापूर – आषाढी यात्रा कालावधीत गतवर्षी पालखी मार्गावरील गावात “कचरा मुक्त गाव “ ही संकल्पना राबविणेत आली होती. हीच संकल्पना जिल्हयात राबविणेत येणार असून १५  मे २०२३ पासून सर्व ग्रामपंचायती व गावे कचरा मुक्त करणे साठी “कचरा मुक्त गाव अभियान” सुरू करणेत येणार असल्याची माहिती  सोलापूर जिल्हा परिषदेचे सिईओ व प्रशासक दिलीप स्वामी यांनी दिली. 

सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सिईओ यांचे दालनात आज जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत व ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांचे बैठकीचे आयोजन करावेत आले होते. या प्रसंगी सिईओ दिलीप स्वामी यांनी कचरा मुक्त गावाची संकल्पना सांगितली. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, शिक्षणाधिकारी माध्यमिक जावेद शेख, जिल्हा  कार्यक्रम  व्यवस्थापक सचिन  जाधव, अधिक्षक सचिन सोनकांबळे, प्शंरशिक्षण समन्कवयक शंकर बंडगर, सनियंत्रण सल्लगार  यशवंत्ती धत्तरे, घनकचरा सल्लगार मुकूंद आकुडे, संवाद सल्लगार सचिन सोनवणे, सांडपाणी तज्ञ प्रशांत  दबडे, क्षमता बांधणी तज्ञ महादेव शिंदे उपस्थित होते.  


सिईओ स्वामी म्हणाले, तिर्थक्षेत्राचा जिल्हा म्हणून  सोलापूर जिल्हा  ओळखला जातो. सोलापूर जिल्हातून भीमा नदी वाहते. पंढरपूर येथे चंद्रभागा नदी म्हणून ओळखली जाते. ‘नमामि चंद्रभागा’ या नावाने जिल्ह्यात आपण अभियान राबविले आहे. जिल्ह्यात नदी काठा बरोबरच इतर गावात स्वच्छतेचे सातत्य टिकवून ठेवणे व गाव कचरा मुक्त करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. चंद्रभागा व इतर नद्याचे  प्रदूषण रोखता येईल.


महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम ४५ ग्रामसूची मध्ये ग्रामपंचायत पातळीवर वैद्यकीय व आरोग्य या सदराखाली गावस्तरावर स्वच्छता राखणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात घरगुती व सार्वजनिक पातळीवर घनकचऱ्याचे भौगोलीक परिस्थिती नुसार पारंपारीक व अनियोजित आधुनिक तंत्रज्ञाने पदधतीने व्यवस्थापन केले जाते. तसेच घरगुती पातळीवर उकीरडे व सार्वजनिक पातळीवर सार्वजनिक खत खड्डयात किंवा उघडयावरच प्रक्रीया न करता किंवा कच-याचे वर्गीकरण न करता कचरा टाकला जातो. गावस्तरावर कचरा व्यवस्थापन ही समस्या निर्माण होत आहे. व परिणामी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण होत आहे. ग्रामपंचायत स्तरावर रस्त्याच्या दुतर्फा, बस स्थानके, धार्मिक स्थळे. ऐतिहासिक स्थळे बाजार तळ दुकाने तसेच वर्दळीच्या ठिकाणी मोठयाप्रमाणात कचरा साठलेला असतो. अशा उघडयावर साठलेल्या कच-यामुळे नागरीकांच्या सार्वजनिक आरोग्यास धोका पोहोचतो. तसेच दृष्यात्मक स्वच्छता ही दिसुन येत नाही. असेही सिईओ स्वामी यांनी सांगितले. 


केंद्रपुरस्कृत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत वैयक्तिक / सार्वजनिक शौचालय बांधकाम, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन इत्यादी घटकां साठी ग्रामीण पातळीवर अंमलबजावणी सुरू आहे. त्यान्वये ग्रामपंचायत स्तरावर शाश्वत स्वच्छता ठेवण्याचे कामकाज सुरू आहे. केंद्र व राज्य स्तरावरून घनकचरा व्यवस्थापन करणे बाबत वेळोवेळी सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. सोलापूर  जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीं व पर्यायाने जिल्हा कचरा मुक्त करणे करीता सर्वाचा सहभाग आवश्यक आहे.  तालुका स्तरावर करावयाची पूर्वतयारी  – (दि. १० मे ते १४  मे २०२३)

 

१.     तालुका स्तरावर गटविकास अधिकारी यांनी गाव / ग्रामपंचायत निहाय संपर्क / पालक अधिकारी यांची नेमणूक करावी.

२.     तालुका स्तरावर बैठक घेऊन संबंधितांना कचरा मुक्त गाव करणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करावे.

३.     नदी काठच्या ग्रामपंचायतीचा स्वतंत्र आराखडा तयार करणेत यावा.

४.     odf मधील मोडेल झालेले ग्रामपंचायती चा पण यात समावेश करणेत यावा. त्या पद्धतीने नियोजन करून आराखडा जिल्हा कक्षास सदर करावा.

५.     आषाढी यात्रचे  पार्श्वभूमीवर पाळी मार्गावरील ग्राप मध्ये व्यापक प्रमाणावर जनजागृती करणेचे नियोजन करावे.

६.     गाव पातळीवर लोगो सह बनर तयार करणेत यावा. गाव पातळीवर भिंतीवर स्लोगन  टाकणेत यावेत.  स्वच्छ सर्वेक्षण २०२३ चा लोगो काढण्यात यावा.

७.     गाव पातळीवर होत असलेल्या कामाबद्दल पालक अधिकारी यांचा साप्ताहिक आढावा घेणेत यावा.

 

उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे म्हणाले , प्रत्यक्ष अभियान दि. . १५ मे ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत  राबविणेत येणार आहे. 

 जिल्हा परिषदेचे यशवंतराव चव्हाण सभागृहात १५ मे रोजी  प्रारंभ करून अभियानास सुरुवात करणेत येणार आहे. तालुका व गाव पातळीवर या अभियानाचा शुभारंभ करणेत यावा. असेही सांगितले . 

गाव कचरा मुक्त करणेसाठी आवश्यक ती सर्व प्रचार प्रसिध्दी गावपातळीवर करणेत यावी. या बाबत ग्रामस्थामध्ये मध्ये जनजागृती करावी. सदर बाबत अमंलबजावणी न केलेस नियमानुसार दंड अथवा कारवाई करणेत येईल याची सुचना ग्रामस्थांना देण्यात यावी.

नियोजन मासिक सभेत / ग्राम सभेत करणेचे आहे. यासाठी आवश्यक असणान्या निधीची तरतुद ग्रामपंचायतीने करावी.स्वच्छ भारत मिशन (SBM) / १५ वा वित्त आयोग/MGNREGA / राष्ट्रीय बायोगॅस व खतवस्थापन कार्यक्रम/ जिल्हा वार्षिक योजना / उदयोजकांचे सामाजिक उत्तरदायीत्व (CSR)/ नाविण्यपुर्ण योजना / लोकप्रतीनिधी यांचा विकास निधी/ ग्रामपंचायत निधी/ जि.प. निधी इत्यादी निधीमधून खर्च करावा.सदर निधी खर्च करताना त्या-त्या योजनेशी निगडीत शासन निर्णयात नमूद अटी, शर्ती चे व निकषांचे पालन करणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक राहिल.

 

ग्रामपंचायत स्तरावर करावयाची कार्यवाही -……

 सर्व ग्रामपंचायतींनी त्यांच्या स्तरावर जिथे दैनंदिन लोकवर्दळ जास्त आहे, तिथे व सार्वजनिक रस्ते / बाजार स्थळ / बस स्थानके / इतर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छते करीता दैनंदीन झाडलोट व्यवस्था करावी. जास्त लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींनी वॉर्डनिहाय नियोजन करावे.झाडलोट झाल्यानंतर जमा झालेला कचऱ्याचे ओला व सुका असे वेगवेगळे वर्गीकरण करणेत यावे. व असा कचरा कुंडीत संकलीत करणेत यावा . कचरा मुक्त गाव करणेसाठी कचरा संकलन हे घरगती व सार्वजनिक पातळीवर योग्य पदधतीने होणे आवश्यक आहे.


सार्वजनिक संस्था/ परिसर या ठिकाणीही या प्रमाणे संकलन होणे आवश्यक आहे. संकलित कचरा वाहतुकीसाठी आवश्यकते नुसार ग्रामपंचायतींनी वाहतुकीच्या व्यवस्थेचे नियोजन करणेचे आहे. असा वाहतूक केलेला कचरा हा कचरा प्रक्रिया प्रकल्पावर आणुन त्यावर प्रक्रिया करणेत यावी.ओल्या कच-यापासुन गांढूळ खत/ नॅडेप खत / कंम्पोस्ट खत प्रकल्प इ. आधुनिक प्रक्रीया प्रकल्प करावे. तसेच सुका कचरा प्लास्टिक/काच/कागद /लोखंड यांचे पुर्नप्रक्रियेसाठी पाठविण्याबाबत नियोजन करणेत यावे. ( पुर्नप्रक्रीये बाबत काम करणा-या संस्था / व्यक्तींची माहीती घेणेत यावी.)

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम ४५ (ग्रामसूची ) अन्वये नेमून दिलेल्या कर्तव्यान्वये गावांमध्ये शाश्वत स्वच्छता रहावी या करीता तालुक्यातील जादा लोकसंख्या असणाऱ्या शहरालगत असणाऱ्या, लोकवर्दळ. तिर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ असणाऱ्या ग्रामपंचायतींनी गावस्तरावर कचरा संकलन, वर्गीकरण, वाहतूक व त्यावर प्रक्रिया करीता बाहय संस्था / कंपन्यांची विहीत पध्दतीने निवड करणेत यावीया करीता संबंधीत संस्थेस प्रकल्प देखभाल दुरुस्ती, मनुष्यबळ वेतन, इत्यादी करीता प्रति कुटुंब शुल्क आकारणी करणेसाठी आरोग्य कर अथवा इतर कर या सदरा खाली मासिक अथवा वार्षिक दर आपले ग्रामसभेत / मासिक सभेत ठरवून अंतिम करणेत यावेत. शासन स्तरावरून घनकचरा व्यवस्थापना बाबत वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणेत यावे.

तरी सोलापूर जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी या महत्वपुर्ण समाजोपयोगी विशेष अभियानामध्ये लोक सहभाग वाढविण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करून प्रचार व प्रसार करून प्रबोधन करावे. आवश्यक ती सर्व कार्यवाही करून ग्रामपंचायती कचरा मुक्त होतील हे पहावे. असेही जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी सांगितले.

SendShareTweetSend
Previous Post

आमदार सुभाष बापूंना चंद्रकांत बावनकुळे यांचा मिश्किल ‘ चिमटा’ ; धीरगंभीर चेहरा केलेल्या देशमुखांना प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले पहा हा व्हिडिओ

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेत परिचारिका दिन साजरा ; परिचारिका या आपल्या आयुष्यातील ‘देवदूत’

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेत परिचारिका दिन साजरा ; परिचारिका या आपल्या आयुष्यातील 'देवदूत'

ताज्या बातम्या

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026

क्राईम

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996451
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group