सोलापूर : सोलापूर जिल्हा काँग्रेसमध्ये मागील काही दिवसांपासून तालुका अध्यक्षांच्या निवडीवरून बरीच नाराजी समोर आली होती. जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या कारभारावर ही काही नाराज कार्यकर्त्यांनी टीका केली, हा विषय प्रदेश पातळीवर गेला. दरम्यान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सोलापूरला आले असता त्यांच्याकडे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन जिल्हाध्यक्ष मोहिते पाटील यांना पदावरून काढावे अशी ही मागणी केल्याचे पाहायला मिळाले.
पक्षातील वाद मिटावेत, समन्वयाने पक्षाचे कामे व्हावी यासाठी प्रदेश पातळीवरून ब्लॉक अध्यक्ष आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या पदांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. नाराज माजी तालुकाध्यक्षांना वरिष्ठ पदे देऊन नाराजी घालवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसत आहे. जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांचे या निमित्त पाहायला मिळत आहे.
मंगळवारी जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या उपस्थितीत या नियुक्ती पत्राचे वाटप केले. यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे व प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांचीही उपस्थिती होती. यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष पदावर नंदकुमार पवार, सुरेश शिवपुजे, संजय दिलीपराव पाटील यांची तर फिरोज सरचिटणीस पदावर सौदागर जाधव, सुनील मोरे यांची निवड करण्यात आली आहे.
ब्लॉक अध्यक्षपदी अक्कलकोट शंकर म्हेत्रे, दक्षिण सोलापूर हरीश पाटील, उत्तर सोलापूर शालिवाहन माने देशमुख, मंगळवेढा प्रशांत साळे, मोहोळ सुलेमान तांबोळी, बार्शी ग्रामीण सतीश पाचकवडे, बार्शी शहर विजय साळुंखे, माढा ऋषिकेश बोबडे, पंढरपूर ग्रामीण हनुमंत मोरे, पंढरपूर शहर अमर सूर्यवंशी, सांगोला अभिषेक कांबळे, माळशिरस सतीश पालकर, करमाळा प्रतापराव जगताप, वैराग राहुल खरात, अक्कलकोट शहर रईस टिनवाला, कुर्डुवाडी फिरोज खान




















