सोलापूर : शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालयाच्या वतीने विविध योजनांचे दाखले, प्रमाणपत्र वितरण करण्यासाठी महाशिबिराचे करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन या मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी क्रमांक २ संतोष देशमुख, तहसीलदार राजशेखर लिंबारे, मंद्रूपच्या सरपंच अनिता कोरे, माजी सभापती गुरुसिद्ध म्हे, हनुमंत कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी माळी यांच्यासह इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार देशमुख यांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले, तालुक्यातील प्रत्येक घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचल्या पाहिजेत. केवळ एका दिवसाचे शासन आपल्या दारी शिबिर न घेता प्रत्येक महिन्याला घेऊन सगळ्या योजनांचे लाभ घ्यावेत अशी मागणी त्यांनी बोलून दाखवली.
याचवेळी खालून एक चिठ्ठी आली. त्या चिठ्ठी मध्ये लिहिले होते, बापू अधिकाऱ्यांना ताकीद द्या, याचवेळी तलाठी गावात थांबत नाही, रेशन धान्य मिळत नाही, रेशन कार्ड नाहीत अशा अनेक तक्रारी नागरिकांत पुढे आल्या त्याला अनुसरून आमदार देशमुख यांनी कामचुकार अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरला. बापू काय म्हणाले, पहा हा व्हिडिओ


















