आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष निधीतून दिवंगत नगरसेवक सुनील कामाठी व माजी नगरसेविका प्रतिभा मुदगल यांच्या प्रयत्नामुळे अंदाजित रक्कम १९.२५ लक्ष रुपये खर्चून प्रभाग १३ मधील पाथरुट चौक ते गेंट्याल चौक हा डांबरीकरण रस्ते विकासकामांचा शुभारंभ प्रभागातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते युवकांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या शुभारंभावेळी संजय साठे, प्रभाकर साठे, यतिराज अडसुळे, आनंद मुदगल, आकाश कामाठी, महेश अलकुंटे, जितेंद्र अलकुंटे, विशाल धोत्रे, चंद्रकांत मुदगल, अतिश अलकुंटे, उत्तम यमपुरे, आकाश गायकवाड, संतोष क्षीरसागर, सतिश अडसुळे, शुभम कांबळे, अतिश गायकवाड, रुपेश साठे, विनोद डुकरे, मक्तेदार अंबादास शिंदे आदींसह मोठया संख्येने सदर परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.
खूपच दयनीय अवस्था असलेल्या मोठया प्रमाणात रहदारी असणाऱ्या रस्त्याचं आज डांबरीकरण होतोय. फार वर्षांनी होणाऱ्या कामाबद्दल सदर परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.


















