सोलापूर : 31 मे रोजी जिल्हा प्रशासनातील अनेक अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या सेवानिवृत्तीनंतर प्रशासनाने आनंदी निरोप दिला. याच दिवशी अधिकाऱ्यांच्या मनाचा मोठेपणा काय असतो याचा प्रत्यय जिल्हाधिकारी कार्यालयात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील धुळाप्पा कोळी हे कोतवाल बावीस वर्षाच्या सेवेनंतर बुधवार 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले.
मागील काही वर्षापासून कोळी हे अप्पर जिल्हाधिकारी यांच्या शासकीय निवासस्थानी सेवेत होते. प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी कोतवाल कोळी यांना आपल्या कार्यालयात बोलावले आणि विशेष म्हणजे आपल्या स्वतःच्या खुर्ची शेजारी दोन खुर्च्या टाकत त्यांना आणि त्यांच्या पत्नींना बसवले दोघांनाही भर आहेर करून त्यांचा सन्मान केला. हा सन्मान पाहून कोळी पती पत्नीचे डोळे पाणावले होते.
जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या मनाचा मोठेपणा पाहून त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी सुध्दा भारावून गेले, केवळ सत्कार नाही तर कोळी पती पत्नीला आपल्या शासकीय वाहनातून त्यांच्या घरापर्यंत सोडण्यास चालकाला सांगितले.



















