सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे या ठाकरे कुटुंबीयांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर रायगडावर शिवप्रेमींची मोठी गर्दी झाली आहे.
या सोहळ्याला ठाकरे कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित नाही ते सर्व लंडन या ठिकाणी गेले आहेत. यावरून वाघमारे यांनी ठाकरे कुटुंबियांवर तोफ डागली. बहुतेक महाराष्ट्राची उष्णता सहन होत नाही म्हणून थंड हवेच्या ठिकाणी लंडनला गेलेत का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सडकून टीका केली.


















