सोलापूर : नांदेड जिल्ह्यामधील बोंडार हवेली या गावात आंबेडकर जयंती साजरी केल्यामुळे जातीद्वेषातून अक्षय भालेराव या युवकाची हत्या करण्यात आली त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करून खटला चालवावा या मागणीसाठी सोलापुरातील सामाजिक कार्य करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला एकवटल्या आहेत.
महिलांच्या या शिष्टमंडळात पल्लवि सुरवसे, रेश्मा मुल्ला, विशाखा उबाळे, नुसरत शेख, आशालता आव्हाड, सविता कांबळे, प्रतिभा एकमलले, पुष्पा गायकवाड, अनिता गवळी, अनिता गायकवाड, नसीमा शेख यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे.
पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या अशा घटना रोखण्यासाठी राज्य शासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.



















