सोलापूर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पार्क चौक येथे आडम मास्तर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
लोकशाही मूल्यावर आधारित संविधान बदलण्याची भाषा आणि सुर निघत आहे. हे कदापि चालणार नाही. या देशाची राज्यघटना बदलून मनुवाद आणण्याचा प्रयत्न जनता हाणून देशातील भाजप विरोधी सर्व नेत्यांनी एकत्रित रहावे असे आवाहन माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी केले.
यावेळी ॲड.अनिल वासम, वीरेंद्र पद्मा, बाळकृष्ण मल्याळ,विजय हरसुरे,नागेश म्हेत्रे,नरसिंग म्हेत्रे,दाऊद शेख, जावेद सगरी,अभिजित निकंबे,दत्ता चव्हाण,प्रदीप मरेड्डी,बजरंग गायकवाड,बालराज म्हेत्रे,सिद्राम गडगी,युसुफ शेख संजीव ओंकार,गोपाळ जकलेर, मल्लिकार्जुन बेलीयार, सनी आमाटी, अंबादास बिंगी,नितीन गुंजे,गंगाराम निंबाळकर अंबादास गडगी आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.