शहर भाजपाच्या वतीने पार्क चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
महापरिनिर्वान दिनाचे औचित्य साधून सोलापूर शहर भाजपाच्या वतीने पार्क चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी खासदार अमर साबळे व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, मनिष देशमुख, हेमंत पिंगळे, प्रा नारायण बनसोडे, माजी नगरसेविका संगीता जाधव, सभागृह नेते श्रीनिवास करली, नागेश भोगडे, शिवानंद पाटील, रोहिणी तडवळकर, राम तडवळकर, वंदना गायकवाड, अजित गायकवाड, राजाभाऊ माने आदी उपस्थित होते.
यावेळी अमर साबळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे देशावर अनंत उपकार असून त्यांच्या विचारांना आज आम्ही अभिवादन केल्याचे सांगितले.