सोलापूर | शेतकरीच्या हितासाठी होत असलेल्या तिऱ्हे येथील ब्रिज कम बंधाराला विरोध करणे चुकीचे आहे.. आमदार सुभाष दशमुख यांनी प्रयत्न करून केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे कडून हा प्रकल्प मंजूर करून घेतला . याला निधी ही केन्द्र सरकार देणार आहे.. हा बंधारा सहा महिन्यांत पूर्ण करुन राज्यसरकारचे पाटबंधारे विभागाला हस्तातरित होणार आहे..असे असताना विनाकारण या कामा साठी अडथळा आनून शेतकऱ्यांच्या अन्नात विष कलवण्याचा प्रयत्न करू नये..दिपक आबा रोज तुम्ही या रस्त्याने ये जा करता..तुम्ही विधान परिषदेचे आमदार असताना या बेगमपुर व तिऱ्हे येथील नदीवर असा प्रकल्प व्हावा यासाठी का प्रयत्न केले नाहीत..आता आमचे स्थानिक आमदार सुभाष दशमुख यानी हा भारतातील पहिला नदीवरील रस्त्याच्या पुलावर ब्रिज कम बंधारा केंद्राकडून मंजूर करून आणला त्यासाठी तुमचे पोटात पोटशूळ उठण्याचे काय कारण..तुम्ही पण शेतकरीच हिताचासाठी एखादा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला तर आम्ही तुमचे स्वागतच करू..पण परत कुणी तिऱ्हे बंधारा ला केवळ राजकारण मानून विरोध केलात तर शेतकरी तुमचे तोंडाला काळे फसल्याशिवाय गप्प बसणार नाही. असा इशारा सिद्धेश्वर साखर काखान्यांचे माजी संचालक आणि सीना नदीकाठ संघर्ष समितीचे अध्यक्ष भारत जाधव यांनी दिला आहे…


















