सोलापूर ! बहुजन रयत परिषदेच्या नवनिर्धार संवाद अभियाना अंतर्गत निघालेल्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे विषयी व समाजातील अनेक प्रश्नांविषयी संबंधित जिल्ह्यातील मंत्री आमदार खासदार यांना निवेदने देण्यात आली आहेत.
जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर दरम्यान केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना भेटून सोलापूर शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी रेल्वे प्रशासनाची जागा मिळावी या मागणीचे निवेदन देण्यात आले. सोलापूर शहरातून राष्ट्रीय महामार्ग जाणार असून त्या दरम्यान शहरात उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे त्यामुळे अण्णाभाऊंचा पुतळा पूर्णपणे बाधित होणार असून सध्या स्थित असलेल्या पुतळ्याच्या पाठीमागील रेल्वे प्रशासनाच्या जागेची मागणी करण्यात आली.
![]() |
अत्यंत आपुलकीने बहुजन रयत परिषदेचे संस्थापक प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी रेल्वे राज्य मंत्र्याची भेट घेतली लगेच जागा पुतळ्यास देण्याची ग्वाही ना रावसाहेब दानवे यांनी दिली.
यावेळी बहुजन रयत परिषद महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष कोमल साळुंखे,बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे, ईश्वर क्षीरसागर,बहुजन रयत परिषद जालना युवक जिल्हाध्यक्ष अंकुश अष्टुळ, ईश्वर क्षीरसागर, विशाल खंदारे,विनीत जाधव व बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते





















