सोलापूर : आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीचा एक भाग म्हणून एमआयएमचे निरीक्षक अन्वर सादात यांनी रविवारच्या आपल्या सोलापूर दौर्यात शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन, मान्यवरांच्या गाठीभेटी, युवक पदाधिकार्यांच्या निवडी करत वातावरण निर्मिती केली. यावेळी त्यांच्यासोबत शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व कार्यक्रमांना मिळणारा प्रतिसाद पाहता यावेळी सादात यांनी महापालिकेत एमआयएम किंगमेकरची भूमिका निभावेल, असा विश्वास व्यक्त केला.
सकाळी 11 वाजता सादात यांच्या हस्ते युवक कार्याध्यक्ष मोईन शेख यांनी रहमतबी टेकडी येथे आयोजित केलेल्या मतदान नोंदणी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यानंतर नगरसेवक गाझी जहागीरदार यांच्या १८ लाख निधीतून जगदंबा चौक व इतर ठिकाणी होणार्या रस्ता कामाचा व बोअरच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. दुपारी 12 वाजता मौलाली चौक येथील साद दवाखाना फलकाचे उद्घाटन करण्यात आले. एमआयमच्याच टिचरविंग तर्फे आयोजित टीईटी वर्कशॉपचे उद्घाटन, युवा अध्यक्ष मोहसिन मैंदर्गीकर यांनी मंगळवार बझार येथे आयोजित केलेल्या मेळाव्याला मार्गदर्शन केले.
यावेळी अनेक युवकांनी एमआयएममध्ये प्रवेश केला. यावेळी युवक पदाधिकार्यांच्या निवडीही सादात यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आल्या. सायंकाळी 4 वाजता बेगम पेठ येथे 1 नं. शाळा येथे नगरसेवक रीयाज खरादी गटनेता यांनी आयोजित केलेल्या मतदान नोंदणी व आरोग्य शिबिराला उपस्थिती दर्शवली. नई जिंदगी येथे अझहर जहागिरदार यांच्यावतीने आयोजित मतदान नोंदणी अभियानाचे भेट देण्यात आले व नगरसेवक अझहर हुंडेकरी यांच्या AIMIM कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमाला शहराध्शक्ष फारूक शाब्दी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
महापालिका निवडणुकीत पुन्हा एमआयएमची ताकद दाखवा
आगामी काळात महापालिका निवडणूक होत आहे. गेल्या निवडणुकीत एमआयएमचे 9 नगरसेवक निवडून आले होत. यंदा फारूख शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली त्याही पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणत एमआयएमची ताकद सर्वांना पुन्हा दाखवून द्या, खा. ओवेसी आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहे, असे अन्वर सादात यांनी सांगितले.



















