सोलापूर : महेश कोठे आणि मनोहर सपाटे यांचे राजकीय शत्रुत्व सर्व परिचित आहे, महेश कोठे हे 2009 च्या विधानसभा निवडणुकीत कोठेंच्या पराभवास सपाटे कारणीभूत होते, त्यानंतर महापालिका निवडणुकीत सपाटे यांचा पराभव महेश कोठे यांचे पुतणे देवेंद्र कोठे यांनी केला यानंतर राजकीय शत्रुत्व वाढतच गेले, अशातच कोठे शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मात्र कोठें ना विरोध करत आहेत त्यामध्ये सपाटे यांचा ही समावेश आहे, दरम्यान राष्ट्रवादीने महापालिका निवडणुकीची सर्व सूत्र कोठे यांच्या ताब्यात देण्याच नियोजन केले आहे, सपाटे यांनाही समज देण्यात आलाय त्यामुळे सपाटे कोठें सोबत जुळवून घेतल्या शिवाय पर्याय नाही.
येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील सर्व 26 प्रभागात राष्ट्रवादीने संवाद यात्रा कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.त्यानिमित्त बैठक घेतली या बैठकीला सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फ्रंटल, सर्व प्रमुख सेलचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते, शहराध्यक्ष भारत जाधव व शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या अध्यक्षतेखाली माजी महापौर महेश कोठे, नगरसेवक तौफिक शेख, प्रदेश उपाध्यक्ष शफी इनामदार, माजी महापौर सुभाष पाटणकर, माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, माजी महापौर मनोहर सपाटे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, पद्माकर काळे, राजन जाधव,नगरसेविका सुनिता रोटे, युवक शहर अध्यक्ष जुबेर बागवान आदी तसेच इतर ज्येष्ठ नेते, प्रांतिक सदस्य यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडली.
सोलापूर महानगर पालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी संपूर्ण राष्ट्रवादी परिवार या नियोजनात्मक प्रभाग संवाद यात्रेच्या आयोजनात जूटला असून संपूर्ण शहर त्यानिमित्ताने राष्ट्रवादीमय करण्याचा मानस यावेळी प्रत्येकांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे महेश कोठे व मनोहर सपाटे या दोन नेत्यांचे मनोमिलन झाल्याचं चित्र दिसून आलं.
या बैठकीत येत्या पाच सप्टेंबर पासून शहरातील सकाळ व संध्याकाळ अशा दोन वेळी एकूण 26 प्रभागात तेरा दिवस प्रभाग संवाद यात्रेचे आयोजन करण्यात येणार असून त्याची प्रमुख जबाबदारी शहर मध्य, उत्तर, दक्षिण विधानसभा अध्यक्ष यांच्यावर सोपविण्यात आली असून नियोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रम अंतर्गत त्या – त्या प्रभागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहतील. यावेळी अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सर्व जेष्ठ नेते, प्रांतिक सदस्य व फ्रंटल सेलचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष हे त्याठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असतील.


















