सोलापूर : उद्धवा अजब तुझे सरकार, मंदिर बंद, उघडले बार..,उद्धवा धुंद तुझे सरकार,असे म्हणत सोलापूर शहर जिल्ह्यात मंदिरे उघडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने बाळीवेस मध्ये मल्लिकार्जुन मंदिर समोर निदर्शने करण्यात आली…. राज्यातील महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी झाली सरकारने राज्यातील बार उघडले मात्र मंदिरे अजूनही उघडली नाहीत त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निषेध नोंदवण्यात आला या आंदोलनात आमदार सुभाष देशमुख, महापौर श्रीकांचना यंनम, शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्यासह पक्षाचे नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान कोरूना च्या परिस्थितीमध्ये हे आंदोलन भारतीय जनता पार्टीने केल्याने पोलिसांनी या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले…


















