समाज कल्याण आयुक्त पुणे यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी संतोष जाधव यांची पुणे या ठिकाणी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या संशोधन अधिकारी पदी बदली झाली आहे.
तर त्यांच्या जागेवर लातूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी नागनाथ चौघुले हे पुन्हा सोलापूरला येत असून त्यांच्याकडे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण हीच जबाबदारी देण्यात आली आहे. परभणीचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन कवडे यांची संशोधन अधिकारी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सोलापूर या पदावर नियुक्ती झाली आहे. जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी संतोष जाधव यांची केवळ एका वर्षाच्या आतच बदली करण्यात आली आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मागील वर्षभरात काम केले आहे मात्र समाजकल्याण सहाय्यक आयुक्त म्हणून आलेले नागनाथ चौगुले हे यापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये समाज कल्याण अधिकारी त्यानंतर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण या दोन्ही पदावर त्यांनी काम केले आहे त्यानंतर त्यांना उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये नियुक्ती करण्यात आली त्यांची सोलापुरात त्याच पदावर नियुक्ती देण्यात आली आहे .






















