काँग्रेस पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील हे गुरुवारी पदभार घेणार आहेत, अकलूजचे मोहिते पाटील म्हटल्यावर त्यांचा थाट वेगळाच असतो, काँग्रेस भवनात मंगळवारी जिल्हाध्यक्ष धवलसिंहांच्या पदभाराची लगबग आणि जोरदार तयारी दिसून आली, अकलूज वरून मोहिते पाटलांचे स्वीय सहाय्यक सुधीर रास्ते हे सोलापूरात तळ ठोकून आहेत, जनसेवेचे कार्यकर्ते अभिराज शिंदे, मेहबूब तांबोळी हे सुद्धा काँग्रेस भवनात दिसले, माजी प्रवक्ते डॉ बसवराज बगले, माजी सभापती भीमाशंकर जमादार, उपाध्यक्ष मल्लेशी बिडवे, हे मंगळवारी दिवसभर काँग्रेस भवनात ठाण मांडून होते.
जिल्हाध्यक्ष कार्यालयात अनेक बदल करण्यात येत आहेत, पूर्वी जिल्हाध्यक्षांची खुर्ची उत्तरेकडे तोंड करून होती, ती बदलण्यात आली आहे आता धवलसिंह मोहिते पाटील यांची खुर्ची पूर्वेमुखी करण्यात आली आहे, तसा बदल भवनात करण्यात आला, पडदे बदलण्यात येत आहेत खुर्ची नवीन आणण्यात आली, स्वागत कमानची तयारी सुरू आहे ,स्वागत फलक,नामफलक बदलण्यात आले.
काँग्रेस भवनाच्या प्रवेशद्वारासमोर शहराध्यक्ष, युवक अध्यक्ष, महिला अध्यक्ष, एनएसयुआय, अल्पसंख्याक, सेवादल यंगब्रिगेड या पदाधिकाऱ्यांचे फलक आहेत आता नव्या जिल्हाध्यक्षांचे फलक कुठे लावायचे असा प्रश्न कार्यकर्त्यांनपडला होता शेवटी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या बोर्डावर जिल्हाध्यक्ष मोहिते पाटील यांचा फलक लावण्याचे नियोजन झाले ते चित्र बुधवारी दिसेल. एकूणच धवलसिंहांच्या पदभार समारंभाची जोरदार तयारी काँग्रेस भवनात सुरू असल्याचे चित्र असून जिल्ह्यात 9 सप्टेंबर पासून धवलपर्व सुरू होणार आहे. गुरुवारचा पदभार समारंभ अशाप्रकारे राहणार आहे




















