सोलापूर : महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते कोरुना नियमांच्या पार्श्वभूमीवर प्रभाकर देशमुख यांना मोर्चा न काढण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाने केल्या होत्या मात्र शेवटी देशमुख यांनी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलाच
दोन ट्रॅक्टर व शंभर शेतकरी व कार्यकर्त्यांना घेऊन ते आले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान बोलताना प्रभाकर देशमुख यांनी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलाबाबत घेतलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली, काही अटी घालत त्यांनी येणाऱ्या आठ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत त्यांनी जिल्ह्यात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा देत त्यांनी शेतकऱ्याचे प्रश्न सोडवावे अशी मागणी केली.



















