सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी जिल्हा नियोजन समिती सदस्य यांच्या सहया घेऊन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना जिल्हा नियोजन समितीची सभा 25 ऑक्टोबर पूर्वी काढावी अशा मागणीचे पत्र देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या दहा दिवसात काढावी अशी मागणी केली आहे त्यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ सदस्य सुभाष माने यांची मागणी दिसून आली, जिल्हा नियोजन समितीची सभा ही जानेवारी महिन्यामध्ये झाली होती ती सभा होऊन आता जवळजवळ नऊ महिने झाले आहेत त्यामुळे अनेक मंजुरी प्रलंबित आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांशी चर्चा करून येत्या 25 ऑक्टोबर पूर्वी नियोजन समितीची सभा काढावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी सांगितले.
सुभाष माने यांनी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे यांना सभाच काढायची नाही, जिल्हा नियोजन भवनात आणि कार्यक्रम होतात पालकमंत्र्यांची दर शुक्रवारी आढावा बैठक होते चार हुतात्मा यांच्यावरील पोस्टाच्या तिकिटाचा अनावरण समारंभ जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात शेकडोंच्या उपस्थित झाला ते प्रशासनाला चालते आणि जिल्हा परिषदेची सभा आणि नियोजन समितीची सभा का होत नाही असा सवाल माने यांनी केला आहे.



















