सोलापूर दिनांक – 10 हजार विडी कामगारांच्या गोदुताई परुळेकर घरकुल वसाहतीत 50 हजार च्या घरात लोकसंख्या पोहोचली.तब्बल 15 वर्षांपासून येथील रहिवासी कडून अंतर्गत मूलभूत व पायाभूत सुविधांसाठी शासन आणि प्रशासन दरबारी पाठपुरावा चालू आहे मात्र अनेक अडचणी व राजकीय आकसापोटी कामाला विलंब होत राहिला. महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंगळवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी कॉ. गोदुताई परुळेकर वसाहतीच्या प्रलंबित प्प्रश्नांबाबत माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांना मंत्रालयात आमंत्रित केले व स्वतंत्र बैठक घेण्यात आली.
या बैठकीत गोदुताई ला 31 डिसेंबर 21 पर्यंत स्वतंत्र ग्रामपंचायत घोषित करा. रस्ते दुरुस्ती व पुनर्रडांबरीकरणा साठी 1 कोटी 50 लाख निधीची तरतूद करा,जल जीवन मिशन योजना अंतर्गत पाण्यासाठी 30 कोटी निधीची तरतूद करा,तसेच अंतर्गत मलनिस्सारण साठी 60 कोटींची गरज असून स्वच्छ भारत अभिमान योजना अंतर्गत मंजूर करण्याच्या संस्थेच्या प्रस्तावाला मंत्री महोदयांनी तत्वतः मान्यता दिली आदी महत्त्वाचे निर्णय संबंधित विभागाचे प्रधानसचिव,संबंधित सक्षम अधिकारी यांच्या समक्ष झाले असून संबंधित अधिकारी वर्गाला युद्धपातळीवर कार्यवाही पूर्ण करण्याचे चे आदेश दिले.
वास्तविक पाहता यासाठी वारंवार मोर्चे, धरणे आंदोलन, निवेदने,बैठका, पत्रव्यवहार या सनदशीर मार्गाद्वारे संघर्ष करावा लागला.आजचे हे निर्णय ही त्याची फलश्रुती आहे. असे कॉ.गोदुताई परुळेकर वसाहतीचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आनंद व्यक्त केले.ही कॉ.गोदुताई परुळेकर वसाहती करीता ही दिवाळी भेट असेल असे ही ते म्हणाले.
याविषयी असे की, कॉ. गोदुताई परुळेकर विडी वसाहतीत जवळपास 40 ते 50 हजार लोकसंख्या असुन महिन्याला फक्त तीनच दिवस पाणीपुरवठा होत आहे, 16 वर्षापुर्वी तयार करण्यात आलेले मुख्य रस्ते पुर्णपणे उखडलेले आहे .कॉ आडम मास्तर हे आमदार असताना सन 2005 आणि 2008 मध्ये शासनाकडुन 5 कोटी निधी आणल्यामुळे हे रस्ते झाले आहे, त्याच प्रमाणे लिचपिट, सोपपिट हे 15 वर्षापुर्वी झालेले असुन त्यांचे आयुष्य संपलेले आहे ते केंव्हाही निकामी होऊन प्रंचड घाणीचे साम्राज्य वाढण्याची शक्यता वाढली आहे. स्वतंत्र ग्रामपंचायत नसल्याकारणाने साफसफाई होत नसल्यामुळे ठिकठिकाणी कचरा साचत आहे त्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता जास्त आहे या करिता गेल्या 3/4वर्षा पासुन रस्त्यावरची लढाई , आंदोलन, मोर्चाचे, काढुन शासनाचे लक्ष वेधण्याचे काम सातत्याने कॉ आडम मास्तर हे जिद्दीने पाठपुरावा सुरूच होता त्या अनुंषगांने मा. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दि 12/10/21 रोजी सकाळी 11.00 वाजता मंत्रालयात बैठक बोलावली व ती बैठक 40 मिनटे चालली. सदर बैठकी मध्ये ग्रा. मा. क्र 18 व 19 ह्या रस्ताया वरून दररोज 50,0000 लोकांची वाहतुक असुन दररोज किरकोळ अपघात घडत असुन व काहींना कायमचे अंपगत्व सुध्दा प्राप्त झाले आहे. कामगार व महीला आपला जीव मुठीत धरून कसेबसे राहत आहेत यांची संपुर्ण माहिती कॉ आडम मास्तर यांनी दिली.
त्यानुसार आजच्या बैठकी मध्ये मा. मंत्री महोदय यांनी या वसाहतीच्या निवडणुकी च्या आत यांची अंमलबजावणी करावी असे स्पष्ट निर्देश दिले मंत्री महोद्यांनी खालील प्रश्न मान्य करून ते मार्गी लावा असे आदेश दिले 1)ग्रा.मा.क्र.18 व 19 रस्ते पुन डांबरीकरण, दुरूस्ती करण्याचा आदेश दिला असुन त्यास लागणारे 1कोटी 50 लक्ष रूपयांची सुध्दा तरतुद करण्यात यावी असे आदेश दिले 2)स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याकरिता दि 12/2/2004 रोजी च्या च्या शासन निर्णयाच्या अनुच्छेद च मधील बद्दल करून 31/12/2021या विडा वसाहतीस पर्यंत स्वतंत्र ग्रामपंचायत जाहीर करा अशी सुचना सुध्दा अधिकारी वर्गाला दिली. या मुळे ग्रामपंचायत स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला. या निर्णय मुळे वसाहतीमधील नागरिकांनी आंनद व्यक्त केला ह्या बैठकीस मा राजेश कुमार मिना अप्पर मुख्य सचिव ग्राम विकास विभाग, मा. देशमुख उपसचिव ग्रामविकास विभाग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा. संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. शेळकंदे ग्राम विकास विभाग जिल्हापरिषद सोलापुर आदी उपस्थित होते.


















