सोलापूर – जिल्हा परिषदे शिक्षण विभागात कार्यरत उप शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असणारे गौरी धायगुडे यांची तहसीलदार पदी निवड झाली आहे. महिलांनी सर्व क्षेत्रात नाव कमवावे. मला पण दोन मुली आहेत. माझ्या मुली माझा अभिमान आहेत. असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज महिला व बाल कल्याण विभाग, शिक्षण विभाग व ग्रामीण विकास यंत्रणा विभाग यांचे संयुक्त विद्यमाने महिलांचे आरोग्य व उपवास , महिलांचे अधिकार व महिलांची सुरक्षितता या बाबत चर्चा सत्राचे आयोजन करणेत आले होते. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे हस्ते शिक्षण विभागातील उप शिक्षणाधिकारी गौरी यशवंत धायगुडे यांची तहसीलदार पदी निवड झाले बद्दल सत्कार करणेत आला. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील , प्रकल्प अधिकारी जावेद शेख, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, जि प सदस्य रेखा राऊत, जि प सदस्य मंजुषा कोळेकर, जि प सदस्य स्वाती कांबळे, उपशिक्षणाधिकारी सुधा साळुंखे,आहार तज्ञ डॉ सोनाली घोंगडे, उमेद अभियानाच्या मिनाक्षी मडीवळे, सखी सेंटरच्या सुवर्णा गाडेकर व जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील महिला अधिकारी व कर्मचारी प्रमुख उपस्थित होते.
……………….
मला दोन मुली आहेत. मला माझ्या दोन्ही मुलींचा अभिमान आहे. स्त्री भ्रुण हत्येवर मी काम केले आहे. महिलांना संधी दिली पाहिजे. त्या सक्षम आहेतच. प्रशासनात काम करीत असताना किमान सुविधा महिलांना देणे साठी आमचा प्रयत्न सुरू आहे. महिलांना चांगल्या प्रकारे सुरक्षा देणे साठी व्यापक प्रमाणात नियोजन करीत आहोत. जिल्हयात १ लाख २५ हजार महिला बचत गटात कार्यरत आहेत. वर्षभरात चार नवरात्र असतात. या नऊ दिवसांना का महत्व देतो. महिला सक्षमीकरण करत असताना महिला या सक्षमच आहेत. त्यांना संधी दिली पाहिजे. दुर्गा देवीची नऊ रूपांचा अभ्यास केला पाहिजे. महत्व माहित करून घेतले पाहिजे. महिला व बालकल्याण विभागासाठी ९ कार्यक्रम देणेत आले आहेत. असेही दिलीप स्वामी यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणाले, महिलांचे आरोग्य चांगले रहावे. त्यांना चांगल्या प्रकारे सुरक्षितता देणे साठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. ऋतु नुसार फळांचे सेवन केले पाहिजे. व्यायाम व आहाराकडे लक्ष दिले पाहिजे.असेही अध्यक्ष कांबळे यांनी सांगितले.
जिल्हा परिषद सदस्या रेखा राऊत म्हणाल्या, महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील म्हणाले, महिला या आदिशक्ती म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज चंडीची पुजा करत आहेत. स्त्री त्यागावर घर पुढे जाते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. प्रतिमा पुजना नंतर महिला बालकल्याण विभागातील सौ. कुलकर्णी यांनी स्वागत गीत सादर केले. यावेळी आहारतज्ज्ञ डॉ. सोनाली घोंगडे यांचे महिलांचे आरोग्य व उपवास या विषयावर व्याख्यान झाले. महिला अधिकाराचा जागर हा फक्त नवरात्री पुरता मर्यादित न राहता वर्षभर व्हायला हवा. उपवास हा शास्त्रशुद्ध पद्धतीने करावयास हवा. प्रत्येक धर्मात उपवास सांगितले आहेत. शरीराचे निर्विषीकरण करण्यासाठी उपवास केला जावा. .
यावेळी उपशिक्षिका स्मिता मुराळी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उप शिक्षिका रेखा सुतार यांनी केले. उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी आभार मानले.


















