सोलापूर:- जन्माला आलेल्याला प्रत्येकास संघर्ष करावा लागतो. जीवनात येणाऱ्या अडचणींचा सामना करत जी माणसं अथक परिश्रम करतात तीच असामान्य बनतात असे विचार पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी मांडले. ते “पे बॅक टू सोसायटी संकल्पने” अंतर्गत सम्यक अकॅडमी च्या मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच बहुजन शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था नूतन कार्यालयाच्या उद्घाटन समारंभप्रसंगी बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन शिक्षक महासंघाचे
प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते.यावेळी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, महानगरालिका शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी कादर शेख, पोलीस उपनिरीक्षक रणजित कोळेकर, सोलापूर वेतन पथक अधिक्षक प्रकाश मिश्रा, जात पडताळणी कार्यालयाचे एस एस मोटे,जकराया डवले(मध्य रेल्वे,सोलापूर) यांची प्रमुख उपस्थिती होती.
माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन आपल्या सोबत सर्वांना मोठं करण्याचा सम्यक मार्ग सम्यक अकॅडमीने निवडला असून तो अतिशय स्तुत्य आहे. पोलीस उपनिरीक्षक रणजित कोळेकर म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रात संघर्ष आहे. आपल्या परिस्थितीचा बाऊ न करता संघर्ष करत रहा.यश नक्कीच मिळेल.
प्रशासन अधिकारी कादर शेख म्हणाले, ध्येय साध्य करण्यासाठी अडथळे येणारच आहेत. विद्यार्थ्यांनी आपली जिद्द,चिकाटी सोडता कामा नये. यावेळी एस ए मोटे, जकराया डवले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मिलिंद जक्कल, जैन गुरूकुल प्रशालेचे प्राचार्य आशितोश शहा,
माध्यमिक शिक्षण विभागाचे संजय बानुर, बहुजन शिक्षक महासंघाचे राज्य सरचिटणीस बोधीप्रकाश गायकवाड,उपाध्यक्ष बाळासहेब डोळसे, रवि देवकर, शिवाजी जगताप, रामकृष्ण इंगळे, मल्लिकार्जून कांबळे, किशोरभाऊ बनसोडे, बहुजन शिक्षक महासंघाचे सर्व तालुकाध्यक्ष, पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ , सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुद्धजय भालशंकर यांनी केले सूत्रसंचालन मंजुश्री खंडागळे आणि चारुशीला भालशंकर यांनी केले तर कु.क्रांती हिने सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमासाठी सत्यवान पाचकूडवे, बी एन गायकवाड, मिलिंद भालशंकर,सुशिलचंद्र भालशंकर, संतोष वाघमारे, कैलास माने,विष्णू लादे यांनी विशेष परिश्रम घेतले.

















