Thursday, September 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : पंढरपूरातील या मार्गाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले तातडीचे 74 कोटी मंजूर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 November 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी पंढरपुरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज पालकी मार्ग व इतर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे स्थापना व उद्घाटन झाले केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी यावेळी आपल्या भाषणात या दोन्ही पालखी मार्गांच्या उभारणीसाठी 12 हजार कोटी रुपयांचा खर्च लागणार असून यामुळे दळणवळण अगदीच सोपे होणार असल्याचे सांगत वाखरी ते पंढरपूर या मार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करत तातडीचे 74 कोटी रुपये मंजूर करत असल्याची घोषणा केली.

गडकरी म्हणाले , 221 किलोमीटर अंतर असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गासाठी 7 हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. या मार्गाचं काम पुढील एक ते सव्वा वर्षात पूर्ण होईल, अशी आशा आहे. तसेच संत तुकाराम महाराज पालखी महामार्गासाठी 5 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गाची लांबी 130 किलोमीटर इतकी आहे.

दरम्यान, राज्य सरकार या पालखी मार्गावरील पालखी तळांच्या कामासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार 1248 कोटी खर्च करणार आहे. यामुळे वारकऱ्यांची वारी अजून सोपी होईल. गडकरी म्हणाले , महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्री जाणारे भक्तीमार्ग तयार करण्याचे काम सुरु आहे, याचा मला सर्वाधिक आनंद होत आहे.

गडकरी म्हणाले, पंढरपूर ही संतांची भूमी, केवळ पंढरपूरच नव्हे तर महाराष्ट्र ही साधूसंतांची भूमी आहे. येथील साहित्य आणि कलेत संतांचं मोठं योगदान आहे. या साधूसंतांसाठी पंढरपूर हे सर्वात विशेष स्थान आहे. दरवर्षी येथे चार यात्रा होतात. महाराष्ट्र आणि आसपासच्या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात वारकरी येथे पायी येतात. या वारकऱ्यांसाठी पालखी मार्ग निर्माण करण्याचं काम मला मिळालं आहे, हे माझं सौभाग्य आहे.

भारतमाला परियोजनेत देशभरातील 50 धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. यावर 12070 कोटी रुपये खर्च करुन 673 किलोमीटरचं काम पूर्ण झालं आहे. तर बाकी 827 किलोमीटरचं काम सुप्रीम कोर्टाच्या परवानगीनंतर पूर्ण केलं जाईल. त्यामुळे आगामी काळात भाविक वर्षभर कधीही चारधाम, गंगोत्री, बद्रीनाथला जाऊ शकतील. मानसरोवरचा मार्ग पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात तुळजापूर, शेगाव, कोल्हापूर, माहूर, शिर्डी येथील भक्तीमार्ग पूर्ण करण्याचा प्रयत्न जात आहे राज्यातील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या भूमीपूजन कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी उपस्थित आहेत, याचा मला आनंद होतोय, असं गडकरी म्हणाले.

SendShareTweetSend
Previous Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतले श्री विठुरायाचे दर्शन ; भाजपचे हे दोन आमदार होते सोबत

Next Post

ब्रेकींग : झेडपी समाज कल्याणचा ‘स्वामी’ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ; सभापतीच्या चेंबरमध्ये झाली कारवाई

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : झेडपी समाज कल्याणचा 'स्वामी' लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ; सभापतीच्या चेंबरमध्ये झाली कारवाई

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000875
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group