सोलापूर : राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी राज्यातील सहा विधान परिषदेच्या जागा साठी निवडणूक जाहीर केली यामध्ये सोलापूरचा मात्र समावेश करण्यात आला नाही. 75 टक्के पेक्षा कमी मतदारांची अट दाखवून ही निवडणूक रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांची घोर निराशा झाली आहे तसेच मतदारांच्या स्वप्नावर पाणी फेरले.
राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णया विरोधात आता भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातील नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे समर्थक संतोष पाटील यांनी सोलापूरची निवडणूक रद्द करणे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि जिल्हा प्रशासनाचे एकत्रित षड्यंत्र असल्याचा थेट आरोप केला आहे, पराभवाच्या भीतीने राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकार्यांना हाताशी धरून 75 टक्के पेक्षा कमी मतदार संख्या दाखवली आहे .
मुळात नव्याने गठीत झालेल्या नगरपंचायतच्या नगरसेवक मतदारांचा आकड्यांचा ताळमेळ घालून ही मतदारसंख्या 75 टक्के पेक्षा कमी दाखवण्यात आली आहे मात्र, नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतींचा या निवडणुकीचा कोणताही संबंध नाही जिल्ह्यातील 417 मतदारांच्या आशेवर त्यांनी पाणी फेरले असून आपण भारत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे त्याचबरोबर उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे संतोष पाटील यांनी सांगितले.
पहा काय म्हणाले संतोष पाटील हा व्हिडीओ


















