सोलापूर : दमाणी नगर परिसरातील सुंदराबाई डागा प्रशालेच्या मैदानावर रात्रीचा धुमाकूळ घातलाय. टिप्परच्या फाळक्याच्या आणि मुरुम ओतण्याच्या आवाजाने सर्व नागरिकांना त्रास होत आहे. गेले ६ दिवस रात्री ११ नंतर टिप्परचे मोठाले आवाज होत आहेत.
हे काम दिवसा सुध्दा होऊ शकते, त्या साठी परिसरातील नागरिकांनी त्रास का सहन करावा? हे काम नक्की कुणाचे आहे? शासनाचे का कुठल्या बड्या ठेकेदाराचे? याबाबतीत सर्वांची आळी मिळी गुपचीळी आहे. ना नगरसेवक लक्ष देत आहे ना प्रशासन ना पोलीस.
सुंदराबाई डागा प्रशालेच्या मैदानावर बेसुमार मुरूम साठवण केली जात आहे, या कामासाठी प्रशालेचे गेट तोडण्यात आले आहे तर भिंत सुध्दा पाडण्यात आली आहे.
एरवी रात्री १० नंतर फटाके वाजवले तर कारवाई करणारे पोलिस आणि प्रशासनाला हा रात्रभर होणारा कर्कश्श आवाज ऐकु येत नाही का?
हा आवाज बंद न झाल्यास ईथले नागरीक संबंधित ठेकेदारावर आणि जर हे काम महापालिकाचे असल्यास पालिके विरुध्द तक्रार दाखल करणार आहेत. तसेच रास्तारोको करुन संबंधित डंपर अडवण्यात येतील. असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.


















