सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी “मुख्यमंत्री जाऊ द्या मरू द्या” असे बोलता बोलता बोलून गेले होते. मात्र हे वक्तव्य बातमीचे असल्याने ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर शिवसेनेमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. केवळ एक तासभरातच पालकमंत्री भरणे यांनी दिलगिरी व्यक्त करत हा विषय संपला, तेव्हापासून पालकमंत्री भरणे यांचा पत्रकारांवरील रोष कायम असल्याचं दिसून येतं, सोलापुरातल्या कोणत्याही कार्यक्रमात मी किती चांगला, तुम्ही मला ओळखलं नाही, मी साधा सरळ, माणसात रमणारा असं सांगून स्वतःच स्वतःचे गोडवे गातात.
शुक्रवारी श्रमिक पत्रकार संघ व मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमातही त्यांनी “मुख्यमंत्री जाऊद्या मरु द्या” यावर भाष्य केले. आज पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागात मोठ्या प्रमाणात शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे त्या खात्याचा मंत्री म्हणून मी जाणे भाग आहे, मी सर्व शासकीय बैठका रद्द केल्या परंतु तुमचा कार्यक्रम असल्याने मला रद्द करता येत नाही मी हा कार्यक्रम जाऊ द्या मरू द्या असेही म्हणू शकलो असतो मात्र ते शक्य नव्हते हि रेघ धरून त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री जाऊद्या मुद्द्यावर भाष्य करताना आपले स्पष्टीकरण दिले हे बोलतानाही पालकमंत्री भरणे मामा चांगलेच खजील झाले होते पहा हा व्हिडीओ…

















