सोलापूर : आदर्श संविधान माध्यमातून डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येक घटकाचा सूक्ष्म विचार करून न्याय दिला म्हणून आज सर्वागीण विविधता असलेले देश अखंड राहून स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव साजरा करीत आहे असे प्रतिपादन वालचंद महाविद्यालयातील प्रा डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंचायत समिती दक्षिण सोलापूर आयोजित अभिवादन कार्यक्रम प्रसंगी प्रा.चव्हाण बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, बाबासाहेबांनी अस्पृश्य उत्थान बरोबर स्त्रियांचे उत्थान केले म्हणून आज भारत बलशाली झाला आहे म्हणून तर कोलंबिया विद्यापीठाने त्यांचे विद्यापीठातील पुतळ्यावर सिम्बॉल ऑफ नॉलेज असा सन्मान केला.
या कार्यक्रम प्रसंगी भंत्ते सारीपुत्र यांनी भीमवंदना व पूजन केले. सभापती सोनाली कडते व उपसभापती रामप्पा चीवडशेट्टी यांनी आपल्या मनोगतातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन केले . प्रास्तविक गट विकास अधिकारी राहूल देसाई यांनी , आभार सहाय्यक प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज,सूत्रसंचालन विस्तार अधिकारी जयश्री सुतार यानी केले.
कार्यक्रम प्रसंगी सर्व खाते प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मल्हारी बनसोडे, विक्रम शहा, अप्पासाहेब गायकवाड,महेश रुपणार,अभिजीत घोगरे सर, बाळासाहेब महमने भिमाशकर वाले, नागेश कदम आदींनी परिश्रम घेतले.

















