सोलापूर : करमाळा तालुक्यातील मकाई साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विजय रणदिवे यांना मारहाण केल्याची घटना घडली.
मकाई साखर कारखान्याने मागील वर्षीची एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापि जमा केलेले नाही असे असताना जिल्हाधिकार्यांनी हे कारखाण्याचे गाळप बंद ठेवण्याचे आदेश दिले होते मात्र या आदेशाला डावलून कारखान्याने गाळप सुरू केले होते याची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी कारखान्यावर जाऊन गाळप थांबवण्याचा प्रयत्न केला यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांचा समावेश होता.
शेवटी कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांनी येत्या काही दिवसात थकीत एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे पत्र दिले मात्र कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल याने येऊन राडा घातला आणि विजय रणदिवे यांच्यावर हात उगारला त्यामुळे कारखान्यावर गोंधळ उडाला शेवटी उपस्थित संघटनेचे कार्यकर्ते बागल यांच्या कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीमुळे गोंधळ थांबला विजय रणदिवे यांनी दिग्विजय बागल याच्यावर या प्रकरणानंतर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली नेमके काय घडले कारखान्यावर पहा


















