सोलापूर – जिल्हयात दि. १५ व १६ डिसेंबर रोजी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण साठी विशेष मोहिम हाती घेणेत आली आहे. स्वच्छ सर्वेक्षणात हालगर्जी पणा नको.. काम करणांराचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करणार तर कुचराई करणारे कर्मचारी यांचे वर कारवाई करणार असल्याचे असे स्पष्ट आदेश आज सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निजीकक्षात आज स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियान चा आढावा या बाबत गटविकास अधिकारी व तालुका स्तरावरील विभाग प्रमुख यांचे आॅनलाईन व्हीसीचे आयोजन करणेत आले होते. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे , उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मीता पाटील, कार्यकारी अभियंता दीपक कोळी प्रमुख उपस्थित होते.
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मध्ये सर्व कर्मचारी चांगले काम करीत आहेत. अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षक, उमेद मधील बचतगट, मदतनीस, बीआरसी व सीआरसी, यांचे बरोबर ग्रामसेवक यांनी दोन दिवस मोहिमेचे नियोजन करावे.
माझी वसुंधरा अंतर्गत १५ डिसेंबर रोजी होणार बैठकीत स्वच्छ सर्वेक्षण २०२१ वर ग्रामस्थांचे अभिप्राय घ्यावेत. १ हजार गुणांचे सर्वेक्षण असणार आहे. मोबाईल अॅप व वेब वर ग्रामस्थांचे अभिप्राय घ्या. सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता ठेवा. स्वच्छ सर्वेक्षणचे लोगो ग्रामपंचायत इमारत व सार्वजनिक इमारतींवर काढा. सांडपाणी व घनकचरा तसेच अग्नी, जल, वायु, आकाश व पृथ्वी या पाच घटकांवर स्लोगन भिंतीवर काढा. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. सर्व कर्मचारी यांनी दोन दिवस स्वच्छतेवर मोबाईल द्वारे अभिप्राय घ्यावेत.
पालकअधिकारी यांनी या कामात कुचराई करणारे कर्मचारी यांची यादी गटविकास अधिकारी यांचे कडे द्यावी. जे चांगले काम करीत आहेत त्यांना सन्मानपत्र देऊन गौरव करणेत येणार असल्याचे सांगितले. दहा हजार कर्मचारी यांचा गैरव करणार आहोत. जे चुकार आहे त्यांना सोडणार नसल्याचे सिईओ स्वामी यांनी सांगितले.
सर्व बचतगटांनी सहभाग देऊन स्वच्छतेवरील अभिप्राय घ्यावेत. यामध्ये उमेदचे कर्मचारी यांनी सहभाग घेऊन उदिष्ट पुर्ण करावे. अशा सूचना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी बचतगटांना दिल्या.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ मध्से सर्व ग्रामपंचातींनी सहभाग घ्यावा. कमी काम करणारे असणारे ग्रामपंचायतींची तपासणी करणार असल्याचे सांगितले. माझी वसुंधरा मध्ये सर्व लागवड झालेले वृक्षांची नोंदणी करा. नोडल अधिकारी नेमा. या मध्ये कुचराई खपवून घेतली जाणार नसल्याचे सांगितले.


















