सोलापूर : भारती विद्यापीठा अंतर्गत अभिजीत कदम इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड सोशल सायन्सेस सोलापूर राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मध्य रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता आभियानाचे आयोजन करण्यात आले होते. सुरवातीला इन्स्टिटयुटचे संचालक डॉ. एस. बी. सावंत सोलापूर रेल्वे स्टेशनचे प्रमुख संचालक श्री मीना सर व रेल्वे स्टेशनचे व्यवस्थापक श्री सिंह सर यांचे स्वागत केले. आपल्या स्वागतपर भाषणात श्री मीना सर यांनी विद्यार्थ्याना स्वच्छतेचे महत्व सांगितले व विद्यार्थ्यांना आवाहन केले कि त्यानी त्याच्या नातेवाईक, शेजारी व मित्र परिवारा मध्ये रेल्वे स्टेशन स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती करावी. सोलापूर रेल्वे स्टेशन स्वच्छतेच्या बाबतीत मध्य रेल्वे विभागात प्रथम क्रमांकावर तर देश पातळीवर १९ व्या क्रमांकावर येते व याचे श्रेय सर्व सोलापूर करांना असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक प्रा. सी. आर. सुर्यवंशी यांनी विभागा मार्फेत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
इन्स्टिटयुटच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील ६० विद्यार्थ्यांनी या स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला. स्टेशन संचालक श्री मीना यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले व भविष्यात ही इन्स्टिटयुटने मध्य रेल्वे बरोबर असे उपक्रम राबवावेत अशी आशा व्यक्त केली. आभार प्रदर्शन व्यवस्थापन विभाग प्रमुख प्रा. डॉ. पी.पी. कोठारी यांनी केले. यावेळी प्रा. दयानंद म्हेत्रे, मध्य रेल्वेचे कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते..

















