सोलापूर – स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण 2021 मघ्ये अभिप्राय नोंदवा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी केले.
जिल्हा परिषदेमध्ये सिईओ यांचे निधी कक्षात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ बाबत जिल्ह्यातील केंद्र प्रमुख यांचे व्हीसीचे आयोजन करणेत आले होते. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप शिक्षणाधिकारी संजय जावीर, गट शिक्षणाधिकारी भीमाशंकर जमादार, विस्तार अघिकारी स्वाती स्वामी, उमेदच्या मिनाक्षी मडवळी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव प्रमुख उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्सात २० डिसेंबर पर्यंत अभिप्राय नोंदविणेची अंतीम तारीख आहे. उमेद , माध्यमिक शिक्षण विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, ग्रामपंचायत विभाग यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. या मघ्ये कमी पडू नका. असे आवाहन सिईओ स्वामी यांनी केले.
पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी बार्शी, माढा, करमाळा या तालुक्यांनी विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले.
सर्व बचतगट सहभागी होणार – मिनाक्षी मडवळी
सोलापूर जिल्ह्यातील सर्व बचतगट सहभागी झाले आहेत. SSG2021 अंतर्गत अभिप्राय घेणेचे काम सुरू आहे. लोकांचा सहभाग घ्यावा. सर्व बचतगट सदस्यांनी सहभाही व्हावे असे आवाहन केले.

















