Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दिलीप माने यांनी दंड थोपटले..! इथेच उभारणार आणि आमदार होणार…!

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 December 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी गावचे ग्रामपंचायत सदस्य बशीर शेख यांनी दिलीप माने यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच श्री दत्त मूर्ती प्रतिष्ठापना व कोरोना योद्धा सन्मान असे विविध कार्यक्रम आयोजित केले होते.

 दरम्यान दिलीप माने यांचा सत्कार सिलिसिद्ध कोटे ,अमर पाटील ,उस्मान बागवान ,सिद्वेश्वर घोडके ,गणेश माने ,काशिनाथ हरणे ,प्रधान गुरव , सोमनिंग फताटे ,सिराज शेख ,भुताळी घोडके ,गोरख माळी ,राहुल राऊत , चंदू मेजर ,प्रताप हरणे ,सचिन वळसंगे ,लिंबाजी वंजारे ,अमसिद्ध  शिवशरण ,दत्ता माने ,बसवराज गाडेकर, अमसिद्ध  कोरे ,उमेश राऊत ,सादिक हवालदार ,काशीनाथ नामतुरे ,घोशपाक इनामदार ,नजीर शेख ,जितेंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

या कार्यक्रमा मध्ये अनेक कार्यकर्त्यांमधून दिलीप माने यांनी पुन्हा दक्षिण तालुक्याचे नेतृत्व करावे असा सूर पुढे आला.

 हाच धागा परत आपल्या भाषणात दिलीप माने यांनी 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत माझी चूक झाली, मतदारसंघ सोडायला नको होता, मात्र आता निवडणूक इथूनच लढवणार आणि आमदार होणार अशी थेट घोषणा करून टाकली.

परंतू, सध्या दिलीप माने हे नक्की कोणत्या पक्षात आहेत हेच कोणाला माहित नाही. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला, मतदारसंघ बदलला मात्र त्यांचा  पराभव झाला त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टच मध्ये असतात,त्यामुळे राष्ट्रवादीत जातील अशीही चर्चा होती. विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून त्यांच्याच नावाची चर्चा ऐकण्यास मिळाली मात्र विधान परिषद निवडणूक पुढे गेली आणि दिलीप माने यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचे घोडे अडले.

त्यांनी पुन्हा दक्षिणवर लक्ष केंद्रित केल्याने नक्की कोणता पक्ष असेल हा सुद्धा प्रश्न आहे. माने हे काँग्रेस पक्षाकडून 2009 साली दक्षिणचे आमदार झाले होते, 2014 साली भाजपच्या सुभाष देशमुखांकडून त्यांचा पराभव झाला.

 2019 च्या विधानसभा निवडणुकीत नवख्या असलेल्या बाबा मिस्त्री यांनी चांगली फाईट दिली, तब्बल 56 हजार मते घेऊन बाबा मिस्त्री यांनी काँग्रेसची ताकद दक्षिण मध्ये अजूनही कायम आहे हे सिद्ध केले. त्यामुळे पुन्हा दिलीप माने यांना कॉंग्रेस कडूनच उभे रहावे लागणार असे चित्र दिसत आहे. माने यांनी पुन्हा दक्षिण तालुक्यातून दंड थोपटल्याने दक्षिण मतदारसंघात आता राजकीय चर्चेत ऊत आला आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : एसटी कर्मचारी संघटनेत पडली फूट | साेलापुरात २० कर्मचारी हजर | आजच्या सुनावणीकडे लक्ष

Next Post

ब्रेकींग : सोलापूर सिद्धेश्वर यात्रा | जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मागवल्या पालिका व पोलिसांकडून या सूचना

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : सोलापूर सिद्धेश्वर यात्रा | जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मागवल्या पालिका व पोलिसांकडून या सूचना

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979117
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group