१) नाताळ सणाच्या अनुषंगाने शासन गृह विभाग यांचेकडील परिपत्रक क्र. आरएलपी-१२२१/प्र.क्र. २८०/ विशा-१ब दि. २३/१२/२०२१ अन्वये दिलेले निर्देश लागू राहतील. २) लग्न समारंभासाठी बंदीस्त सभागृहामध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्य २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.
३) इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या बंदीस्त ठिकाणी १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.
४) उपरोक्त नमूद कार्यक्रमाव्यतिरिक्त बंदीस्त ठिकाणी स्थायी स्वरुपाची बैठक व्यवस्था असलेल्या ठिकाणी संबंधीत प्राधिकरणाकडून अनुद्येय असलेल्या क्षमतेच्या ५० टक्के पेक्षा जास्त नसेल तसेच ज्याठिकाणी स्थायी स्वरुपाची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी अनुद्येय असलेल्या क्षमतेच्या २५ टक्के क्षमतेपेक्षा जास्त नसेल इतक्या उपस्थितीस व खुल्या जागेत संबंधीत प्राधिकरणाकडून अनुद्येय असलेल्या क्षमतेच्या २५ टक्के क्षमतेपेक्षा जास्त नसेल इतक्या उपस्थितीस परवानगी असेल.
(५) क्रिडा स्पर्धा, खेळांचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
६) वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमातः उपस्थितांची संख्या किती असावी याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे निश्चित करतील. असे करताना दि. २७ नोव्हेंबर, २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल याची दक्षता घ्यावी. (७) उपहारगृहे, जीम, स्पा चित्रपटगृहे नाटयगृहे या
ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील. या आस्थापना धारकांनी त्यांचे परवानानुसार अनुद्येय असलेली त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल. (८) संपूर्ण शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी रात्री ०२.०० ते सकाळी ०६.०० यावेळेत पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असेल.
९) सदर आदेशात स्पष्टपणे समावेश नसलेल्या उपक्रमांबाबत स्थानिक परिस्थितीनुसार अधिक निर्बंध लावणेस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे निर्णय घेऊ शकतील. मात्र असे निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने याबाबतची पूर्व सूचना जाहीर करणे आवश्यक राहील.
(१०) सदर आदेशामध्ये अंर्तभूत असलेले निबंध स्थानिक परिस्थीनुसार अधिक कठोर करावयाचे झाल्यास त्याबाबतचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास असतील. ११) सदर आदेशात नमूद केलेल्या निबंधाव्यतिरिक्त इतर विषयांबाबत शासनाकडील दिनांक २७.११.२०२१ नुसार निर्बंध लागू राहतील.
सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती / संस्था अथवा संघटना यांचेवर भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतूदीनुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र असून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५. साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतूदी आणि इतर कायदे आणि विनियम यानुसार कारवाई करणेत येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांचे विरुध्द संबंधीत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी / विभागीय अधिकारी व अधिनस्त कर्मचारी यांनी कारवाई करावी.
हा आदेश दिनांक २५/१२/२०२१ रोजी रात्री 00.00 वाजलेपासून पुढील आदेश होईपर्यंत लागू राहतील.


















