सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी सोलापूर जिल्ह्यातील सुरु करण्यात आलेल्या ताडी ( शिंदी ) दुकानांना ताबडतोब स्थगिती दया अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांना दिल्या असल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे .
सोलापूरातील बंद पडलेले ताडी ( शिंदी ) दुकाने परत चालु करण्याचा आदेश महाराष्ट्र राज्याच्या प्रशासन विभागाने दिले आहेत . त्यानुसार सोलापूरचे जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाने अंमलबजावणी करीत आहेत. या ताडी ( शिंदी ) दुकाने बंद व्हावे म्हणून महाराष्ट्र कामगार सेना व इतर अनेक संघटनांच्या माध्यमातून शासन दरबारी प्रयत्न चालू आहे .
सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री भरणे यांचा सोलापूर दौरा होता त्यांना निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेना , सामाजिक कार्यकर्ते , राष्ट्रवादी महिला आघाडी , विडी व यंत्रमाग काँग्रेस सेल , R.T.I कार्यकर्ते व पत्रकार संघ अशा सर्व पक्षिय समितीच्या वतीने पालकमंत्र्यांना नियोजन भवन येथे निवेदन देण्यासाठी गेले असता तेथे पालकमंत्री व सर्व अधिकारी नियोजन , कोव्हीड , श्री सिध्देश्वर यात्रा अशा महत्वाच्या विषयावर बैठका सुरु होत्या विष्णु कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्ठमंडळ दुपारी अडीच ते सायं ५ वाजे पर्यंत असे सुमारे ३ तास नियोजन भवनाच्या बाहेर बसून राहिले.
५ वाजता सर्व बैठका संपल्यानंतर पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि सर्व अधिकारी बाहेर आले. तेव्हा विष्णू कारमपुरी यांनी पालकमंत्र्यांनी ताडी निवेदनाबाबत सविस्तर ऐकून घेतले आणि जिल्हाधिकारी यांना बोलवून उदयाच्या उदया ताबडतोब ताडी ( शिंदी ) दुकानांना स्थगिती दया असा आदेश दिला. यावरून ताडी ( शिंदी ) बंदचे स्थगिती दिल्यास महाराष्ट्र कामगार सेना व इतर सर्व संघटनांनी ताडी विरुध्द पुकारलेल्या आदेशांनास यश येण्याची शक्यता आहे.
यावेळी शिष्ठ मंडळात सोहेल शेख , गणेश बोड्डू , लक्ष्मीनारायण दासरी, प्रसाद जगताप , व्यंकटेश पडाल , दत्ता पाटील, दशरथ नंदाल , विठ्ठल कुऱ्हाडकर संजीव शेट्टी , गुरुनाथ कोळी , मारता असादे , लक्ष्मीबाई इप्पा , राधिका इप्पा , निता व्हटकर , अनिता गवळी व सर्व पक्षिय कार्यकर्ते बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

















