सोलापूर- सोलापूर शहर व जिल्ह्यात ताडी विक्री होत असताना अनेक जनाचे कुंटूब उद्वस्त झाले तर विषारी ताडी सेवन केल्यामुळे जिवीत हानीच्या घटना देखील घडलेल्या आहेत. भविष्यात अश्या दूर्घटना टाळण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील ताडी दूकाने बंद करण्याची गरज आहे.सन 2017 मध्ये सोलापूर शहरात ताडी विक्री करण्यास बंदी घालण्यात आली.आता शासनाकडून ताडी दुकाने परत सुरु करण्यास निर्णय घेतला आहे. तर राज्य उत्पादन शुल्क खात्याने शहरात ताडी दूकान सुरु करण्यास इ लिलाव केला. सोलापूर शहर व जिल्ह्यात आजवर ताडीमुळे घडलेल्या घटना पहाता ताडी विक्री ही जिवघेणी ठरणारी असून सोलापूर शहर व जिल्ह्यात ताडी विक्री बंद करण्याची मागणी पृथ्वीराज माने युवा मंचच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी शमा पवार यांना निवेदनाव्दारे केली.
पुणे विजयपूर हायवेस जोडणा-या केगाव -हत्तूर रस्त्याचे काम पुर्ण झालेवरच रस्ता वहातुकीस खुला करा व या मार्गावर झालेल्या आपघाताची चौकशी करुन दोषीवर कारवाई करा,सोलापूर जिल्हा व शहरात ताडी विक्रीस परवानगी देवू नका.या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस स्टेशनचे नामकरण जुळे सोलापूर पोलीस स्टेशन करण्याची मागणी पोलीस आयुक्त यांना पृथ्वीराज माने युवा मंच,उत्तर सोलापूर यांच्या वतीने तालुकाध्यक्ष सुनील बापू जाधव, यांनी दिले
पुणे हायवे ते सोलापूर – विजयपूर हायवे जाण्यासाठी केगांव ते हत्तूर असा बायपास रस्त्याचे काम सूरु आहे. या मार्गावर अनेक ठिकाणची कामे अपूर्ण आहेत. रोड डिव्हायडर, दिशादर्शक बोर्ड, लेन्थ लाईन मारणे, रेल्वे क्रॉसींग पूलाचे काम अर्धवट आहे. तरीही सदर रस्ता 26 डिसेंबरला सूरू होणार अशी वृत्तपत्रात बातमी आली यामूळे या रस्त्यावर कामे अपूर्ण असतानाही वहातूक सूरु झाली. या अपूर्ण कामामूळे या मार्गावर अनेक लहान – मोठे अपघात देखील घडले आहेत. 13 मैल (दक्षिण सोलापूर) येथे मोठा अपघात होऊन यामध्ये चार व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर कवठे (उत्तर सोलापूर) गावाजवळ दिशादर्शक फलक नसल्यामूळे अपघात होऊन चार व्यक्ती मृत झाल्या आहेत. केगांव – हत्तूर बायपास रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच हा रस्ता वहातूकीस सुरु करावा तसेच रस्त्याचे काम अपूर्ण असतानाही रस्ता वहातूकीस सूरु केल्याने या रस्त्यावर झालेल्या अपघाताची चौकशी करून संबधीतावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

















