Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अर्ध्या किमतीतील सोन्याचा मोह नडला | गुप्ती व कोयत्याचा धाक दाखवून पैसे लुटले

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 January 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर : अर्ध्या किमतीतल्या सोन्याचा मोह नडला आणि कोयत्याच्या धाकाने जवळचेही पैसे गमाउन बसण्याची वेळ आल्याची घटना पंढरपूर तालुक्यात घडली आहे.

या जगात कुणीही कुणाला फुकट अथवा अर्ध्या किमतीत काही देत नसतं तरीही कुणी तशा बतावण्या केल्या की मोहामुळे माणूस सहज फसतो. अशा मोहातच अनेकांची रोज फसवणूक होत असे पण पंढरपूर तालुक्यात एक मोठीच घटना घडली असून लुटारुंच्या टोळीने सोन्याचा मोह दाखवत हातोहात लुटमार केल्याची घटना समोर आली आहे. वाखरी येथील अनिकेत पोरे यांनी याप्रकरणी करकंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या फिर्यादीनुसार अनिकेत पोरे हे ट्रॅक्टर शो रूम मध्ये कामास आहे वाखरी येथील राजशेखर कोरे आणि अनवली येथील रोहित खुणे हे अनिकेत याच्या परिचयाचे आहेत. 

काही दिवसांपूर्वीच अनिकेत, राजशेखर आणि रोहित हे पंढरपूर येथे असताना त्यांचे मित्र गणेश महाराज यांची भेट झाली होती. एका महिलेचा आपल्याला फोन येत असून अर्ध्या किमतीत सोने विकायला ती तयार आहे. दोन नंबरचे सोने असल्याने अर्ध्या किमतीत मिळत आहे, हे सोने घेणार काय ? अशी विचारणा या गणेशने तिघांना केली. अर्ध्या किमतीत सोने मिळतेय म्हटल्यावर कुणालाही मोह हा होणारच होता. अनिकेत, राजशेखर आणि रोहित या तिघांनाही या सोन्याचा मोह झाला. त्यांच्यासोबतच्या दोघांनी सोने खरेदी करायची तयारी दाखवली. यावेळी या गणेश याने सोन्याचा एका फोटोही दाखवला आणि ९३७३३०७९४३४ हा मोबाईल क्रमांक दिला. 

अर्ध्या किमतीत सोने मिळतेय म्हटल्यावर आणि फोन नंबर हातात आल्यावर लगेच पुढची हालचाल सुरु झाली. मिळालेल्या फोन क्रमांकावर संपर्क साधला गेला . या फोनवरून एक महिला बोलू लागली. अर्ध्या किमतीत सोने  देण्याची तयारी दाखवत या महिलेने त्यांना करकंबजवळ भेटण्यास सांगितले. भेटीची तारीखही दिली. त्यानुसार हे चौघेही करकंब येथे पोहोचले . त्यावेळी मात्र त्या महिलेने टेंभुर्णी रस्त्यावर एका आडबाजूच्या ठिकाणी त्यांना नेण्यात आले. या महिलेने एक किलो सोने असल्याचे सांगत अंगठ्या आणि काही दागिने त्यांना दाखवले. 

एवढे सोने घेण्याएवढे पैसे चौघांकडे नव्हते त्यामुळे त्यांनी या महिलेला तसे सांगितले. आम्ही सद्या तेवढे पैसे आणले नाहीत त्यामुळे थोडेच सोने खरेदी करणार असल्याचे त्यांनी या महिलेला सांगितले. त्याचवेळी सोने विकण्यासाठी म्हणून आलेल्या पाच लोकांनी जवळ लपविलेल्या चाकू आणि अन्य गुप्तीसारखे शस्त्र बाहेर काढले आणि अनिकेत याच्या गळ्याला लावले. राजशेखर याच्या गळ्याला कोयता लावून ‘सगळे पैसे काढा नाहीतर खल्लास करून टाकू ‘ अशी धमकी दिली. चौघांच्याही अंगावरील सोने आणि रोख रक्कम त्यांनी काढून घेतली आणि तेथून ते पसारही झाले.  सोने विकण्याच्या बहाण्याने फसवणूक आणि लूटमार करणाऱ्या त्या पाच जणांच्या विरोधात करकंब पोलिसात गुन्हा दाखल केला असून करकंब पोलीस अधिक तपास करीत आहेत. अर्ध्या किमतीच्या सोन्याचा मोह या चौघांनाही भलताच महागात पडला आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर | पालकमंत्री भरणेमामा हेलिकॉप्टरने येणार अन् हेलिकॉप्टरनेच जाणार ; कसा आहे दौरा

Next Post

Solapur | ताडी विक्री ही “जीवघेणीच” | ताडी विक्रीला परवानगी देऊ नका

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Solapur | ताडी विक्री ही "जीवघेणीच" | ताडी विक्रीला परवानगी देऊ नका

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979123
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group