जिल्हा परिषदेच्या अभियंता पुरस्कार वितरण कार्यक्रमात सूत्रसंचालकाने सीईओ मनीषा आव्हाळे यांना “मॅडम तुम्ही सोलापुरात सहाय्यक जिल्हाधिकारी झालात आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झालात पुन्हा यापुढे तुम्ही सोलापूरच्या जिल्हाधिकारी म्हणून यावे” अशी अपेक्षा व्यक्त करतात सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. हे ऐकून चेहऱ्यावर हसत हसतच त्या भाषण करायला उठल्या, आव्हाळे यांनी महाराष्ट्र फार मोठा आहे मला महाराष्ट्रात सेवा करायची आहे असे सांगून विषयाला पूर्णविराम दिला, नंतर त्या म्हणाल्या, माझे बाबा मला इंजिनियर हो म्हणायचे. त्यानंतर आयएएस हो असा सल्ला दिला होता मी विधी विभागा पदव्युत्तर शिक्षण घेतले. नंतर आयएएस झाले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज अभियंता दिना निमित्त सर विश्वेश्वरय्या यांची जयंती व उत्कृष्ठ अभियंता पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करणेत आले होते.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या सिईओ मनिषा आव्हाळे या होत्या. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी दिनकर महिंद्रकर प्रमुख उपस्थित होते. या प्रसंगी २६ अभियंतां यांचा सपत्नीक सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करणेत आला. तसेच गुणवंत पाल्यांचा सत्कार सिईओ मनिषा आव्हाळे यांचे हस्ते करणेत आला.
छोट्यातले छोटे काम करा पण चांगले काम करा असे सांगून सिईओ मनिषा आव्हाळे म्हणाले, स्वतच्या कल्पकतेची जोड द्या. आजचे युगात जे तंत्रज्ञान आहे त्यांची जोड द्या. त्याला गुणवत्ता नक्की येईल. पुढच्या २० वर्षे या कामांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. शाळा असे प्राथमिक केंद्र, जलजीवन मिशन, आदी कामे गुणवत्तेची करा असे आवाहन सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिणकर म्हणाले, जलजीवन मिशन, बांधकामे १ व २ तसेच जनसुविधा व इतर कामे अभियंत्यांनी केली आहेत. ४० टक्के पेक्षा अधिक कामे पुर्णत्वाकडे आहे. कधी तरी काम करीत असताना शाबासकीची थाप पाठीवर मिळाली कि काम करणेस प्रेरणा मिळते. असेही अतिरिक्त सिईओ कोहिणकर यांनी सांगितले.
कामात जीव ओतला तर काम करणेस आनंद मिळतो. अभियंत्याचे देशाच्या उभारणीत मोठे योगदान आहे. असे मत कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी बोलताना व्यक्त केले.
या कार्यक्रमास माजी कार्यकारी अभियंता पंडित भोसले, उप अभियंता सुनील कटकधोंड, उप अभियंता सुरेश कमळे, कर्मचारी संघटनेचे विवेक लिंगराज, लिपिकवर्गीय कर्मचारी संघचनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, प्रमुख उपस्थित होते. शाखा अभियंता सोनाली कदम, रविशंकर बोधले, आयुब शेख, सिध्दाराम बोरूटे, सचिन पवार, सुंदर हस्ताक्षर असलेले अभिमन्यु कांबळे, शाखा अभियंता मुजावर, मेघराज कोरे, अभियंता चेतन वाघमारे, माजी उप अभियंता रमेश चौगुले , चेतन भोसले यांनी कार्यक्रम यशस्वी करणे साठी परिश्रम घेतले. प्रास्तविक कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांनी केले सुत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी केले.तर आभार रवीशंकर बोधले यांनी आभार मानले.